Last Updated: Tuesday, March 12, 2013, 20:13
www.24taas.com, मुंबईबॉलिवूडची नवी नाजूक,गोड स्टार अलिया भट्ट हिला नुकतीच एक सणसणीत कानाखाली खावी लागली. दिग्दर्शक महेश भट्टची मुलगी असलेल्या अलिया भट्टने २०१२मध्ये करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
सध्या अलिया भट्ट इम्तियाझ अलीच्या ‘हायवे’ या सिनेमात रणदीप हूडासोबत काम करत आहे. सिनेमाच्या एका सीनमध्ये रणदीप हूडा अलिया भट्टच्या कानाखाली लगावतो. हा सीन खरा वाटावा, यासाठी रणदीपने अलियाला खरोखर कानाखाली मारावी, असं रणदीपला सांगण्यात आलं. त्याप्रमाणे रणदीपने अलियाच्या खरोखरच एक सणसणीत कानाखाली दिली. रणदीपचा तडाखा जोरदार बसला होता. पण, अलियाने मात्र याबद्दल कुठलीही तक्रार न करता आपलं काम चालू ठेवलं. याबद्दल सर्वांनीच तिचं कौतुक केलं.
अलिया सध्या ‘इशकजादे’चा अभिनेता अर्जुन कपूरसोबत आणखी एका सिनेमात काम करत आहे. हा सिनेमा चेतन भगत याच्या ‘२ स्टेट्स’ या कादंबरीवर आधारीत आहे.
First Published: Tuesday, March 12, 2013, 20:13