Last Updated: Tuesday, September 18, 2012, 10:37
www.24taas.com, मुंबईअभिनय रणबीर कपूरच्या रक्तातच आहे. त्याच्या सिनेमांच्या निवडीमुळे, त्यातील त्याच्या अभिनयामुळे आणि उपजत सौंदर्यामुळे रणबीर कपूर लोकांना प्रचंड आवडू लागला. त्याची चाहत्यांची संख्या दिवसें दिवस वाढतच आहे. कमी काळात रणबीर सुपरस्टारपदाला जाऊन पोहोचला. तरीही त्याच्या वडिलांना ऋषी कपूर यांना रणबीरचा अभिनय भावत नाही.
रणबीरचा अभिनय अजूनही परिपक्व नाही, त्यात अनेक त्रुटी आहेत असं मत ऋषी कपूर यांनी नुकतंच एका दैनिकाशी बोलताना मांडलं. त्याला एक कलाकार म्हणून अजून बराच मोठा टप्पा गाठायचाय, असंही ऋषी कपूर म्हणाले. ऋषी कपूर म्हणाले, “रणबीर कधी लार्जर दॅन लाईफ कॅरेक्र्स रंगवत नाही. असं करून तो एक अभिनेता म्हणून मोठी आव्हानं पेलतो, याबद्दल मला अभिमान वाटतो. पण मला त्याचे सिनेमे आवडत नाहीत, कारण त्यात त्याच्या व्यक्तिचित्रणात अनेक त्रुटी आढळून येतात.”
रणबीर कपूर ययाच्याकडे रुप आणि अभिनय यांचा वंशपरंपरागत चालत आलेला वारसा आहे. पणजोबा पृथ्वीराज कपूर, आजोबा राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर वडिल ऋषी कपूर हे सगळेच जण आपल्या काळातील नामवंत अभिनेते होते. रणबीरनेही वेगळ्या भूमिका साकारत आपल्या ताकदीवर सिनेसृष्टीत स्वतःचं नाणं खणखणीत वाजवलं आहे.
First Published: Tuesday, September 18, 2012, 10:30