...आणि मी घाबरलेच : इश्कजादी परिणीती, pariniti chopra on national film award

...आणि मी घाबरलेच : इश्कजादी परिणीती

...आणि मी घाबरलेच : इश्कजादी परिणीती
www.24taas.com, नवी दिल्ली

‘इश्कजादे’ या सिनेमात दमदार अभिनय करून मोठ्या ऐटीत बॉलिवूडमध्ये टाकणाऱ्या परिणीती चोप्रा हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ६० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालाय. ही बातमी ऐकल्यानंतर परिणीती चक्क घाबरली होती, असं आम्ही नाही तर खुद्द परिणीतीनंच म्हटलंय.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं ती पहिल्यांदा घाबरली होती पण याच पुरस्कारानं तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये अजून जोशात आणखी चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन दिल्याचं ती म्हणते. या पुरस्काराची बातमी समजल्यानंतर परिणीतीनं म्हटलंय की, पहिल्याच मुख्य चित्रपटासाठी मला अनेक पुरस्कार प्राप्त झाले पण याच चित्रपटासाठी मला राष्ट्रीय पुरस्कारही मिळेल याची मी कधीच अपेक्षाही केली नव्हती. पण, मला देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळालाय आणि तोही माझ्या पहिल्याच मुख्य भूमिकेसाठी.

परिणीती चोप्रा ही राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची चुलत बहिण आहे. ‘तिनं लेडी वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात तिच्यासोबत आणखी तीन अभिनेत्रीदेखील होत्या.
पण, इश्कजादे हा परिणीतीसाठी नक्कीच खास ठरला. या चित्रपटात ती नवख्या अर्जुन कपूरसोबत दिसली होती. धर्मांध राजकारणात अडकलेल्या प्रेमाच्या या कहानीत परिणीतीनं एका निडर मुलीची भूमिका निभावली होती.

First Published: Tuesday, March 19, 2013, 10:24


comments powered by Disqus