स्पेनमध्ये कॅट-रणबीरची मस्ती!, photo - ranbir katrina in spain

स्पेनमध्ये कॅट-रणबीरची मस्ती!

स्पेनमध्ये कॅट-रणबीरची मस्ती!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांनी कितीही नकार दिला तरी त्यांचे संबंध पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर जाहीर होत आहेत. नुकतंच एका मॅगझीननं या दोघांचे फोटो छापलेत.... कतरिना आणि रणबीर यांच्या प्रेमसंबंधांबद्दल हे फोटोच त्यांच्यापेक्षा जास्त बोलके आहेत.

स्पनेमधल्या आयबिजा समुद्रकिनाऱ्यावर हे फोटो काढले गेलेत. या फोटोंमध्ये रणबीर आणि कतरिना मजा-मस्ती करताना दिसत आहेत. हे फोटो पाहिल्यावर कुणालाही या दोघांच्या प्रेमसंबंधांबद्दल यत्किंचितही शंका उरणार नाही. या दोघांवरही प्रेमाची धुंदी चढल्याचं या फोटोंतून स्पष्ट दिसतंय. मॅगझिननं दिलेल्या माहितीनुसार, ही दोघं स्पेनमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेले असताना हे फोटो घेतले गेलेत. रणबीर आणि कतरिना सध्या बॉम्बे वेल्व नावाच्या एका सिनेमात एकत्र काम करत आहेत.

२००९ साली कतरिना आणि रणबीर पहिल्यांदाच ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा सुपरहीट ठरला होता. त्यानंतर या दोघांबद्दल चर्चा सुरू झाली होती. दोघांनीही आपल्या या नात्याबद्दल गप्प राहणंच पसंत केलंय. पण, ही दोघं आजही बॉलिवूडमधलं हॉट कपल म्हणून ओळखलं जातं, याबद्दल कुणाचं दुमत नसावं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, July 25, 2013, 15:22


comments powered by Disqus