Last Updated: Wednesday, September 26, 2012, 09:58
www.24taas.com, मुंबईकायम आपले नग्न, अर्धनग्न फोटो ट्विटरवर अपलोड करून सवंग प्रसिद्धी मिळवणाऱ्या पूनम पांडेने साडी नेसून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. गणेशोत्सवानिमित्त पूनम पांडेने चक्क साडी नेसली.
अंधेरीतील मुंबईच्या आझाद नगर गणेश उत्सव मंडळात पूनम पांडे जांभळी किनार असलेली पांढरी साडी नेसून आली होती. गेल्यावर्षी पूनम पांडे याच मंडळात शॉर्ट्स घालून आली होती. त्यामुळे मंडळाचे आयोजक पूनम पांडेवर संतापले होते. यावर मंडळ समितींनी मंडळांमध्ये शॉर्ट घालून येण्यावर बंद घातली होती.
यावेळी मात्र पूनम पांडे गणेश दर्शनाला साडी नेसून आली. एवढंच नव्हे, तर श्रद्धापूर्वक गणपतीची आरतीही केली. आयोजक पूनमबद्दल बोलताना म्हणाले, की गेल्यावर्षी पूनम ज्या कपड्यांमध्ये मंडळात आली होती, त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं आयोजकांना कठीण झालं होतं. यावर्षी मात्र पूर्ण कपड्यांतील पूनम पांडे पाहून सगळ्याना आश्चर्य वाटलं. मात्र पूनमने नेसलेली पांढरी साडी पारंपरिक पद्धतीची न नेसता परदर्शक साडी नेसून आपली ‘प्रतिमा’ जपली. याबद्दल काही सदस्यांनी आक्षेप घेतला.
मात्र, पूनमने आपल्या बेधडक स्टाइलनुसार म्हटले, की मी देवासमोर काहीही नेसून आले तरी, देवापासून कुठलीच गोष्ट लपत नाही. देवाला माहित आहे की मी मनुष्यच आहे. मी आयुष्यात दुसऱ्यांदा साडी नेसली आहे.
First Published: Wednesday, September 26, 2012, 09:31