प्रियंका चोप्रा अशियातील सर्वांत सेक्सी महिला Priyanka Chopra becomes Asia`s sexiest woman

प्रियंका चोप्रा अशियातील सर्वांत सेक्सी महिला

प्रियंका चोप्रा अशियातील सर्वांत सेक्सी महिला
www.24taas.com, मुंबई

ईस्टर्न आय या साप्ताहिकाने घेतलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात प्रियांका चोप्राला अशियातील सर्वांत सेक्सी महिलेचं स्थान मिळालं आहे. गेली काही वर्षं मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमनचा किताब करीना कपूर आणि कतरिना कैफच्या पदरात पडत होता. प्रथमच प्रियांकाला हा किताब मिळाला आहे.

ईस्टर्न आयच्या सर्वेक्षणात प्रियांका चोप्रा अशियातील सेक्सिएस्ट वूमेनच्या यादी सर्वप्रथम स्थानावर आहे. तर करीना कपूर दुसऱ्या स्थानावर आणि कतरिना कैफ तिसऱ्या स्थानावर आहे. या वर्षी सर्वांत जास्त चर्चेत राहिलेली अभिनेत्री करीना कपूर असली, तरीही अग्निपथ आणि बर्फीमुळे प्रियांकाला रसिकांची दाद मिळाली होती. तसंच तिचा इन माय सिटी हा म्युझिक अल्बमही नुकताच प्रकाशित झाला. या म्युझिक अल्बममुळे ती गायिका म्हणूनही लोकप्रिय झाली आहे. यामुळेच तिचं अव्वल स्थानावर वर्णी लागली आहे.

एशियाज मोस्ट सेक्सिएस्ट वूमन हा सन्मान मिळाल्याबद्दल प्रियंकाने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसंच आपल्यला खूप आनंद झाल्याचंही तिने म्हटलं आहे.

First Published: Thursday, December 6, 2012, 17:42


comments powered by Disqus