प्रियंका चोप्राला भीती अपयशाची!Priyanka Chopra feels the fear of failure

प्रियंका चोप्राला भीती अपयशाची!

प्रियंका चोप्राला भीती अपयशाची!
www.24taas.com, वृत्तसंस्था, टॅम्पा बे (अमेरिका)

अभिनेत्री प्रियंका चोप्राला सगळ्यात जास्त भीती वाटते ती अपयशाची. प्रियंका म्हणते, जर तिचा कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतो तेव्हा मी कमीतकमी दोन आठवडे तरी आपल्या खोलीतून बाहेर पडत नाही.

प्रियंका म्हणते, "मला अपयशाची खूप भीती वाटते. मात्र यामुळं मी पुढेही जाते. जर माझा कोणता चित्रपट अपयशी ठरला तर मला खूप वाईट वाटतं. मी विचार करते की आपल्या इतक्या मेहनतीनंतरही चित्रपट फ्लॉप झाला. मी दोन आठवडे खोलीतून बाहेरच पडत नाही."

आयफा अॅवॉर्ड्स सोहळ्यात अभिनयावरील परिसंवादात प्रियंका म्हणाली, "जे चित्रपच मी केलेत, त्यामुळे मी खूश आहे आणि `सात खून माफ`, `व्हाट इज य़ूअर राशी` सारखे काही परंपरागत चित्रपट फ्लॉप झाले. मात्र बर्फी सारखा अपरंपरागत चित्रपट हिट ठरला. हा चित्रपट करत असतांना मला अनेकांनी म्हटलं, हा पुरुषप्रधान सिनेमा आहे तू नको करूस, पण मला वाटत होतं की हा सिनेमा करावा आणि त्यानंतर मिळालेल्या यशानंतर मी खूशही आहे." यावेळी प्रियंका सोबत स्टेजवर हॉलिवूड अभिनेते केविन स्पेसी होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 13:18


comments powered by Disqus