Last Updated: Friday, December 6, 2013, 14:39
केंद्रीय मंत्री फारुक अब्दुल्ला यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य करून स्वतःला चर्चेत आणले आहे. फारुक यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यात म्हटले की, आताच्या परिस्थितीत महिलांबरोबर बोलताना ही भीती वाटते. सध्या अशी परिस्थिती आहे की महिलां पीए ठेवण्यास भीती वाटते. यावरच ते न थांबता पुढे म्हणाले की, मी विचार केला आहे. महिला पीए ठेऊन मी स्वतःच जेलमध्ये नको जायला म्हणून महिला पीए ठेवत नाही.