प्रियांका चोप्रा देवीच्या अवतारात! Priyanka chopra turns spiritual diva

प्रियांका चोप्रा देवीच्या अवतारात!

प्रियांका चोप्रा देवीच्या अवतारात!
www.24taas.com, मुंबई

बॉलिवूड स्टार प्रियांका चोप्राने अनेक सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका सादर केल्या. मात्र आता एका जाहिरातीत ती देवीच्या अवतारात दिसणार आहे.

प्रियांका चोप्राने पल्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या. मॉडेल, मॉडर्न मुलगी, चाळीतली मुलगी, मराठी मुलगी, गतिमंद मुलगी अशा अनेक भूमिका तिने साकारल्या. कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक भूमिका तिने सादर केल्या. व्हॉट्स युवर राशी या सिनेमात तर तिने बारा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. आता प्रियांका पेप्सीच्या जाहिरातीमध्ये देवीच्या रुपात दिसणार आहे. ही जाहिरात खास आयपीएलसाठी शूट करण्यात येत आहे.



या जाहिरातीत प्रियांकाची साडी मनीष मल्होत्राने डिझाइन केली आहे. तसंच तिने बरेच दागदागिने परिधान केले आहेत. ही जाहिरात लवकरच टीव्हीवर पाहायला मिळेल.

First Published: Wednesday, April 17, 2013, 17:15


comments powered by Disqus