Last Updated: Wednesday, September 5, 2012, 11:41
www.24taas.com, मुंबईबॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्राच्या पक्षबदलाची चर्चा चांगलीच रंगली आहे. शाहरुख खानच्या कँपमधून दूर गेलेल्या प्रियांका चोप्राने आता बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानशी जवळीक साधण्यास सुरूवात केली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी पहाटे 5 च्या सुमारास प्रियंकाला सलमान खानच्या घरातून बाहेर पडताना अनेक जणांनी पाहिलं. इतकंचनव्हे, तर खुद्द सलमान खान तिला गाडीपर्यंत सोडायला आला. यावेळीही दोघांमध्ये बऱ्याच गप्पा रंगल्या होत्या.
रविवारी रात्री 'एक था टायगर'च्या यशानिमित्त दिग्दर्शक कबिर खानने पार्टीचं आयोजन केलं होतं. कतरिना कैफही या पार्टीला उपस्थित होती. मात्र यावेळी सिनेमाचा हिरो सलमान खान मात्र तिथे नव्हता. तो यावेळी प्रियांका चोप्रासोबत आपल्या घरी होता. एवढ्या रात्री प्रियांका आणि सलमान खान करत काय होते, याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
सलमान खान आणि प्रियंका चोप्राने यापूर्वी सिनेमात एकत्र काम केलं आहे. मात्र, कधीही त्यांच्यात चांगली मैत्री निमाण झाली नव्हती. तर प्रियांका चोप्राची शाहरूखशी जवळीक साधण्यावरून शाहरुख आणि पत्नी गौरी खानमध्ये वाद होऊ लागल्याच्याही बातम्या आल्या होत्या. खुद्द करण जोहरनेही या गोष्टीला पुष्टी दिली होती. त्यामुळे शाहरुख आणि प्रियांकामध्ये दुरावा वाढत चालला होता. मात्र, शाहरुखचाच शत्रू असलेल्या सलमान खानशी मैत्री करत प्रियंकाने संबंध निर्माण करत शाहरुख खान कँपला झटका दिला आहे.
First Published: Wednesday, September 5, 2012, 10:14