Last Updated: Thursday, October 17, 2013, 16:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबई डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवाच्या आगामी `आर... राजकुमार` चित्रपटातील `गंदी बात` गाण्याचा व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला. या गाण्यात प्रभू देवा आणि शाहिदचा डान्सिंग तडका पाहायला मिळतो. `पेपी` प्रकारातलं हे गाणं तरुण वर्गाला नक्की आवडेल.
गाण्यात सोनाक्षी सिन्हानं आपली मादक अदाकारी पेश केलीय, तर शाहिदचे रांगडे रूप पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे शाहिद आणि सोनु सूदबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मीसुद्धा थिरकताना दिसते. या गाण्याचं अनावरण प्रसिद्ध रियालिटी शो `डान्स इंडिया डान्स`च्या मंचावर करण्यात आलं. `आर... राजकुमार` हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात चित्रपटगृहात झळकणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा. पाहा गाण्याचा व्हिडिओ
First Published: Thursday, October 17, 2013, 16:31