Last Updated: Saturday, October 6, 2012, 15:55
www.24taas.comआयटम गर्ल राखी सावंत पुन्हा वादात सापडलीये. राखी सावंतनं एका फॅशन डिझायनरला शिवीगाळ केलीये. पूजा शुक्ला असं या फॅशन डिझायनरचं नाव आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करण्यात आलीये.
राखी सावंतने काही महिन्यांपूर्वी पूजा शुक्ला या फॅशन डिझायनरकडून ४३ डिझायनर कपडे विकत घेतले होते. या कपड्यांची एकूण किंमत काही लाखांच्या घरात जात होती. राखी सावंत पूजा शुक्लाची जुनी ग्राहक असल्याने आधी पैशाच्या बाबतीत पूजाने तिला आग्रह केला नव्हता.
मात्र काही महिने उलटून गेल्यावरही जेव्हा राखी सावंतने कपड्यांचे पैसे दिले नाहीत, तेव्हा पूजा शुक्लाने राखीकडे पैसे मागितले. मात्र यावेळी पैसे न देता उलट राखीनेच तिला शिवीगाळ केला. तसंच `तुला बघून घेईन`, अशी धमकीही दिली. या संदर्भात राखी सावंतची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र लवकरच पोलीस या संदर्भात तपास करून कारवाई करतील.
First Published: Friday, October 5, 2012, 19:49