बदनामी पोटी राखी सावंत ठोकणार ५० कोटींचा दावा, Rakhi Sawant Digwajiy Singh demanded compensation of

बदनामीपोटी राखी सावंत ठोकणार ५० कोटींचा दावा

बदनामीपोटी राखी सावंत ठोकणार ५० कोटींचा दावा
www.24taas.com,मुंबई

काँग्रेसचे वाचाळ नेते दिग्विजय सिंह यांनी अरविंद केजरीवाल यांची तुलना बालिवूडची आयटम गर्ल राखी सावंत हिच्याशी केल्याने राखी जाम उखडलेय. तिने आपली बदनामी केली म्हणून दिग्विजन सिंह यांच्यावर ५० कोटी रूपयांचा खटला भरण्याची हालचाल सुरू केली आहे.

राखी सावंत हिने बदनामी केल्याप्रकरणी राज्याचे गृहसचिव आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहून खटला भरण्याची परवानगी मागितली आहे. दिग्विजय यांनी माझ्या चारित्र्यावर संतोडे उडविले आहेत. त्यामुळे माझी जनमाणसातील प्रतिमा मलिन झाली आहे, असे राखीचे म्हणणे आहे.

दिग्विजय यांच्या वक्तव्याबद्दल आपल्याला तीव्र दु:ख झाल्याचे राखीने म्हटले आहे. माझी प्रतिमा मलिन केल्याने ५० कोटी रूपयांचा दावा ठोकण्याबाबत मी माझ्या वकिलांना सांगितले आहे. वकील एजाज नकवी हे आता त्यांना नोटीस बजावतील.

पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, राज्याचे गृहसचिव, गोरेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना राखीने पत्र लिहिले आहे. मी व्यक्तीगत जीवनात दिग्विजय यांना ओळत नाही. त्यांनी केलेल्या व्यक्तव्याबद्दल माझी प्रतिमा मलिन झाली आहे. माझ्या सन्मानावर डाग पडलाय. ही बाब अत्यंत गंभीर आहे. सभ्यता सोडून ते बोलले आहेत, असे राखीने म्हटले आहे.

दिग्गीराजांनी ट्विट करताना म्हटलं होतं, अरविंद केजरीवाल आणि राखी सावंत एक सारखेच आहेत. दोघेही सतत एक्पोज करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. पण दोघांकडेही ‘दाखवायला’ काहीच नाही.

दरम्यान, राखी सावंत हिची माफी दिग्विजन सिंह यांनी मागितली आहे. मी जुना राखी सावंत हिचा चाहता असल्याचे ते म्हणालेत.

First Published: Tuesday, November 13, 2012, 10:27


comments powered by Disqus