Last Updated: Monday, November 12, 2012, 12:26
www.24taas.com,मुंबईअरविंद केजरीवाल राखी सावंत सारखं एक्सपोस करत असल्याचं वक्तव काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केलं होतं. त्यावरुन राखी सावंत दिग्गीराजांवर चांगलीच भडकली. दिग्विजयसिहांचं मानसिक संतूलन ढळल्याची टीका तिनं केलीय. माझ्यापासून सावध राहा, असा सल्ला तिने दिग्विजयसिंह यांना दिलाय.
दिवाळीत फटाके तर सगळेच फोडतात. मात्र अभिनेत्री राखी सावंतनं शाब्दिक फटाके फोडून काँग्रेस नेते दिग्विजय सिंहांवर हल्लाबोल केलाय. ओ, दिग्विजय संभाळून राहा! आता मी आलेय. तुम्ही मंत्री असलात म्हणून काय झालं. ते कानून हातात घेऊ शकत नाही. मी याना सोडणार नाही. काय समजलेत मी राखी सावंत आहे. मी मामूली मुलगी नाही. माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही खेळणार. तसं मी चालू देणार नाही. आता बघाच तुमची वाट लावते. असं मी चालू देणार नाही. असा इशारा राखीने दिलाय.
आपल्या बेताल वक्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्गीराजांनी केजरीवालांची तुलना राखी सावंत सोबत केली पण ही तुलना केजरीवालांऐवजी राखीलाच जास्त खुपली आणि तिनं खास राखी स्टाईलमध्ये दिग्विजय सिंहांचा समाचार घेतला.
आपल्या वाचाळतेमुळे प्रसिद्ध असणारे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी केजरीवाल यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली. यापूर्वी एकदा केजरीवालांना हिटलर म्हटल्यानंतर आता दिग्विजय सिंगांनी केजरीवालांना राखी सावंत असं संबोधलं आहे.
यावेळी दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवर अगदी खालच्या पातळीवरील ट्विट केलं आहे. आपल्याला कोलंबिया युनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थ्याने आपल्याला हा एसएमएस पाठवला आहे असं म्हणत दिग्गीराजांनी ट्विट केलंय, अरविंद केजरीवाल आणि राखी सावंत एक सारखेच आहेत. दोघेही सतत एक्पोज करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. पण दोघांकडेही ‘दाखवायला’ काहीच नाही.
First Published: Monday, November 12, 2012, 11:54