हॉटगर्ल राखी सावंत करणार भाजपमध्ये प्रवेश, Rakhi Sawant will be in BJP

हॉटगर्ल राखी सावंत करणार भाजपमध्ये प्रवेश

हॉटगर्ल राखी सावंत करणार भाजपमध्ये प्रवेश
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

हॉटगर्ल राखी सावंत भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. याबाबतची माहिती राखीनेचं मीडियाशी बोलताना दिली. राखी मुंबईतून थेट दिल्लीत गेलेय. तिला भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांची भेट घ्यायचे आहे, असे तिने सांगून टाकले.

मी जशी मीडियाची आहे. तशी मी भाजपचीच मुलगी आहे. मी भाजपमध्ये जाणार आहे. मात्र, भाजपचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील. मात्र, मला नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांनी भेट घ्यायची आहे. मी दिल्लीमध्ये चाय पिने आयी हूॅं, असे राखीने यावेळी सांगितले.

बॉलीवूड अभिनेत्री राखी सावंत हिने आज भाजप कार्यालयात जाऊन भाजप कार्यकर्त्यांची भेट घेतली. आपण भाजपचीच मुलगी असल्याचं आणि भाजप हेच आपलं घर असल्याचं तीनं यावेळी जाहीर केलं. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राखी सावंतने भाजप कार्यात्यांची भेट घेतल्यामुळे आता राखी भाजपचमध्ये प्रवेश करण्याची तसेच भजपचा प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे..

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, यात शंका नाही असा दावा राखीने यावेळी बोलताना केला. दिल्ली, मुंबईतील जनता रस्त्यावर उतरून मोदींना सपोर्ट करतील आणि त्यांनी तो करावा. आपल्यावर काय जबाबदारी असेल, या प्रश्नावर भाजपमधील वरिष्ठ निर्णय घेतील असे राखीने सांगून प्रसिद्धीमध्ये येण्याची संधी शोधली हे मात्र नक्की.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 1, 2014, 12:42


comments powered by Disqus