Last Updated: Tuesday, August 27, 2013, 13:55
www.24taas.com झी मीडिया, मुंबईअभिनेता रणदीप हुड्डानं अदिती राव हैदरीसोबत डेटींगच्या बातम्या नाकारल्या असून आपले कोणासोबतही प्रेमसंबंध नाहीत, असं त्यानं सांगितलं.
‘मर्डर ३’मध्ये एकत्र काम करणारे अदिती राव हैदरी आणि रणदीप हुड्डा या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अफवा एकण्यात येत होत्या. पण तसं काहीही नाही, असं रणदिपने सांगितलंय.
या अगोदर रणदीप हुड्डा(३७) याचे सुष्मीता सेनसोबत तर तिच्यानंतर नितू चंद्रासोबत प्रेमसंबंध होते. पण नितू चंद्रासोबत तो वेगळा झाला आणि त्यानंतर अदितीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या अफवा पसरल्या.
रणदीपनं या अफवा खोट्या आहेत असं सांगतिलं. रणदीपच्या मते, तो एकटाच आहे तरी पण लोकांना त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्यात फार उत्सुकता आहे.
रणदीप आता ‘जॉन डे’, ‘उंगली’, ‘हाईवे’, ‘कीक’ आणि ‘बॅड’ या आगामी सिनेमात दिसणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, August 27, 2013, 13:55