अखेर रणबीर-कतरीना 2015मध्ये होणार विवाहबद्ध?Ranbeer Kapoor and Katrina Kaif will Married in Next Yea

अखेर रणबीर-कतरीना 2015मध्ये होणार विवाहबद्ध?

अखेर रणबीर-कतरीना 2015मध्ये होणार विवाहबद्ध?
www.zee24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

स्पेनमधील त्या हॉट फोटोंनंतर चर्चेत आलेली रणबीर-कतरीनाची जोडी अखेर लग्न करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालीय. रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे हॉट कपल पुढील वर्षी म्हणजेच 2015मध्ये लग्न करू शकतात.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार न्यू इअर ट्रीपनंतर कतरीनानं रणबीरला दिलेल्या अल्टीमेटचाच हा रिझल्ट आहे.
रणबीर-कतरीनानं अमेरिकेत न्यू इअरचं एकत्र सेलिब्रेशन केलं. यानंतर कतरीनाला रणबीरकडून काही कमिटमेंट हवंय अशी बातमी होती. रणबीर यासाठी तयार नसल्याचीही चर्चा होती. मात्र आता रणबीर यासाठी तयार झाला असून कतरीनाचं म्हणणं त्यानं मान्य केलंय. म्हणजेच आता रणबीर कतरीनाच्या इच्छेनंच लग्न करेल.

रणबीर-कतरीना ही जोडी `अजब प्रेम की गजब कहानी` या चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र दिसली. चित्रपटानंतर दोघांमध्ये अफेअर सुरू झालं. मात्र तेव्हा त्यांनी ते मान्य केलं नव्हतं. मात्र रिपोर्ट्सनुसार दोघांमध्ये प्रेमसंबंध असून दोघंही लग्न करणार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 27, 2014, 18:12


comments powered by Disqus