वैयक्तिक गोष्टी कोण बाजारात मांडेल? - रणबीर, ranbeer kapoor on spain holidays with katrina kaif

वैयक्तिक गोष्टी कोण बाजारात मांडेल? - रणबीर

वैयक्तिक गोष्टी कोण बाजारात मांडेल? - रणबीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

स्पेनमधल्या समुद्रकिनाऱ्यावर घालवलेल्या सुट्ट्या मीडियात पाहून कतरिना कैफ खूपच भडकली होती. पण, रणबीर कपूरनं मात्र नेहमीप्रमाणेच ‘आपण नाही त्यातले...’ म्हणत कानाडोळा केला. पण, आता मात्र त्याला याबद्दल बोलावंस वाटलंय.

अनुराग कश्यपच्या `बॉम्बे वेल्वेट` या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी श्रीलंकेत गेलेला रणबीर आता मुंबईत परत आलाय. स्पेनमध्ये कतरिनासोबत घालवलेल्या सुट्ट्यांबाबत तो पहिल्यांदाच जाहीरपणे बोललाय. ‘कतरिनाची आणि माझी छायाचित्रे कोणत्याही प्रसिद्धीसाठी नाहीत’ असं त्यानं म्हणत कतरिनाचीच री ओढलीय. त्याला आता कतरिनाबद्दल काळजीही वाटतेय.

`प्रत्येक गोष्टीबद्दल बोलण्याची एक योग्य वेळ असते. हे सगळे झाले तेव्हा मी श्रीलंकेत होतो. माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर केंद्री होतं त्यामुळे आजूबाजूला काय चालले आहे याकडे मी अजिबात लक्ष दिलं नव्हतं. पण, आता मी इथे परत आल्यानंतर मात्र बोलणं गरजेचं आहे’ असंही त्यानं म्हटलंय.

रणबीर म्हणतो, ‘माझ्या आयुष्यात माझे कुटुंब, नातेवाईक यांच्याबरोबरच अयान आणि कतरिना यांचे खास महत्त्व आहे. कतरिनाला माझ्या आयुष्यात खरोखरच महत्त्वाचे स्थान आहे` अशी कबुलीही त्यानं यावेळी दिलीय. रणबीर सध्या मुंबईत `बेशरम` चित्रपटाच्या प्रमोशनच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आपल्या चित्रपटासाठीच त्यानंच ही छायाचित्रे प्रसिद्ध केली असंही म्हटलं जात होतं. पण, रणबीरनं मात्र ही शक्यता धुडकावू लावलीय.

आपल्या वैयक्तिक गोष्टी कोण बाजारात मांडेल असा उलट प्रश्न त्यानं पत्रकारांना केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, September 12, 2013, 16:39


comments powered by Disqus