Last Updated: Monday, October 14, 2013, 18:08
www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबईरणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या फॅनसाठी ही एक निश्चितच निराश करणारी बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून या जोडीचे प्रेमप्रकरण मीडियात खूप चर्चित होत. तसेच दोघांच्या लग्नाच्या वावड्याही होत्या. मात्र नुकतेच दोघांनी सोबत काम करण्यास नकार दिला आहे.
रणबीर-कॅटने एका जाहीरातीत सोबत करावं असा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतू रणबीर तसंच कतरीना दोघांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. एका हेल्थ ड्रिंकच्या जाहीरातीची ही ऑफर होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दोघेही एकत्र काम करू इच्छित नाहीत. या आधीही त्यांनी एक हेअर ऑईलची जाहीरात सोबत करण्यास होकार देऊन नंतर मात्र एकत्र काम केले नाही.
आता रणबीर आणि कतरिना पडद्यावर एकत्र कधी दिसतील हे सांगणे कठीण आहे. ही जोड़ी अनुराग बसुच्या आगामी फिल्म `जग्गा जासूस` मध्ये सोबत काम करणार आहे, अशी शक्यता आहे. मात्र या चित्रपटाला प्रदर्शित होण्यास खूप वेळ आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, October 14, 2013, 18:08