दीपिका देणार रणबीर-प्रियांकाला टक्कर!, Ranbir Deepika going - priyankala collision!

दीपिका देणार रणबीर-प्रियांकाला टक्कर!

दीपिका देणार रणबीर-प्रियांकाला टक्कर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दीपिका पादूकोणही चांगल्या फॉर्मात आहे म्हणूनच तिचे स्टार सध्या उंचीवर आहे. सध्या बॉलिवूडमध्ये रिलीज झालेल्या तिच्या पाच चित्रपटांतून चार चित्रपट हे सुपरहीट ठरले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्ये दीपिका पादूकोणची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या दीपिका पादूकोणची जाहिरातदारांमध्येदेखील मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे जाहिरातीसाठी मोठ-मोठ्या कंपन्या या तिच्यामागे फिरत आहेत. याच कंपन्यांमधून कोका कोला या कोल्ड ड्रिंक कंपनीने दीपिकाला जाहिरातीसाठी एक चांगलीच मोठी ऑफर दिली आहे. कोका कोला या जाहिरातीसाठी दीपिकाला चार कोटी प्रति वर्षाला देण्यात येणार आहे.

दीपिका पादुकोणची सध्या चढाओढ रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा बरोबर आहे. हे दोन्ही स्टार देखील कोका कोलाची प्रतिस्पर्धी कंपनी पेप्सीची जाहिरात करतात. ही माहिती इकोनॉमिक टाइम्स या वर्तमान पत्राद्वारे देण्यात आली आहे. या वर्तमान पत्राप्रमाणे दीपिका आणि कोका कोलामध्ये हा करार करण्यात आला आहे. सध्या दीपिका काम करत असलेली सेलिब्रिटी व्यवस्थापन कंपनी सीएए क्वानचे एमडी अनिर्बन दास यांनीदेखील काही बोलण्यास नकार दिला आहे. तसेच कोका कोलाच्याही वतीने एका प्रवक्त्यानेदेखील यावर काही बोलणे नाकारलंय.

कोका कोला या कंपनीने पेप्सीशी प्रतिस्पर्धा अतिशय गंभीरतेने घेतली आहे. पेप्सी या कोल्ड ड्रिंक कंपनीकडे रणबीर कपूर सारखा चमकदार स्टार आहे. कोका कोला या कंपनीनेही एकटाईम ऐश्वर्या रायला ही आपल्या जाहिरातीत जागा दिली होती. ऐश्वर्याने २००५ पर्यंत कोका कोलाची जाहिरात केली होती. दीपिकाने ही २००८ ते ०९ मध्ये पेप्सीच्या जाहिरातीत काम केले होते. पण यावेळी कोका कोलाच्या जाहिरातीत दीपिका पादुकोण ही फरहान अख्तर बरोबर दिसणार आहे. यावेळी दीपिका रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्राच्या पेप्सीला टक्कर देण्यास सज्ज झाली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 25, 2013, 19:52


comments powered by Disqus