एकमेकांसोबत रणबीर-दीपिका मनसोक्त नाचले!, ranbir deepika made fun and dance a lot

एकमेकांसोबत रणबीर-दीपिका मनसोक्त नाचले!

एकमेकांसोबत रणबीर-दीपिका मनसोक्त नाचले!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एके वेळची लोकप्रिय जोडी असलेल्या अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण मंगळवारी एका कार्यक्रमात एकमेकांसोबत वेळ चांगलाच एन्जॉय करताना दिसले.

काही काळ एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये राहिलेल्या या जोडीला आता ब्रेक अप करूनही काही काळ लोटलाय. पण, या संबंधांचा धक्का बसलेला दीपिकाच्या बोलण्यातून अनेकदा जाणवत राहिलं. परंतु, यावेळी मात्र दोघंही एकमेकांच्या उपस्थितीमुळे जराही चलबिचल झाले नाहीत. दोघांनी एकमेकांचा सामना न करण्याचा नाही प्रयत्न केला ना दोघांच्या मनात याबद्दल थोडीफार धाकधूक दिसली. दोघांनी एकमेकांसोबत खूप सहजपणे डान्सही केला.

रणबीर आणि दीपिका एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमासाठी दाखल झाले होते. यावेळी दीपिकाला बेस्ट एन्टरटेनर तर रणबीरला यूथ आयकॉनचा अवॉर्ड दिला गेला. यावेळी रणबीरला त्याच्या काही लोकप्रिय गाण्यांवर नृत्य करण्याची मागणी केली गेली.

यावेळी स्टेजवर अगोदरपासूनच आमिर खान, कंगना रानौत, सौंदर्या, आर. अश्विन आणि दीपिका पादूकोण उपस्थित होते. पण, जसं रणबीरचं गाणं सुरू झालं दीपिकासोडून इतर सर्वांनी बाजूला होणं पसंत केलं.... आणि रणबीर-दीपिकानं गाण्यांवर मनापासून डान्सही केला. दीपिका-रणबीरनं एकमेकांसोबत हा क्षण चांगलाच एन्जॉय केला.

दीपिका आणि रणबीर ‘बचना ए हसीनों’च्या सेटवर एकत्र आले होते. इथंच त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीलाही प्रारंभ झाला होता. परंतु, ही प्रेमकहाणी फार काळ सुरू राहू शकली नाही... आणि दोघंही एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर रणबीर अनेकदा कतरीना कैफसोबतच्या संबंधांमुळे चर्चेत राहू लागला. रणबीर-दीपिका शेवटी ‘ये जवानी है दीवानी’ या सिनेमात एकत्र दिसले होते.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 16:58


comments powered by Disqus