Last Updated: Monday, September 3, 2012, 16:32
www.24taas.com, मुंबईआपल्या आगामी ‘बर्फी’ या सिनेमामध्ये मुक-बधिर व्यक्तीची भूमिका साकारत असलेला रणबीर कपूरला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. या सिनेमात त्याला एकही डायलॉग किंवा गाणं गायची संधी मिळालेली नाही.
एका पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना रणबीर म्हणाला, की मला सिनेमात एकही डायलॉग नसल्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. हिंदी सिनेमाचा हिरो म्हटला की त्याने भारी डायलॉग बोलायचे आणि गाणी म्हणत नाचायचं असा प्रघात आहे. पण मला ना डॉयलॉग बोलायला मिळाले, ना गाणी गायला...
मात्र तरीही मला हा सिनेमा करताना खूप मजा वाटली, असं रणबीर कपूर म्हणाला. या सिनेमाचं शुटिंग करताना खूप मजा आली. एसंही रणबीर कपूरने कबूल केलं. आर.के. बॅनरच्या पुनरूज्जीवनाबद्दल बोलताना रणबीर म्हणाला, की बिझी शेड्युलमुळे मला दिग्दर्शनाला आणि निर्मितीसाठी वेळ मिळत नाही. पण पुढे मागे मला हे करायला नक्की आवडेल.
First Published: Monday, September 3, 2012, 16:32