दीपिकासमोर टरकतो रणबीर, RANBIR KAPOOR AFRAID IN FRONT OF DEEPIKA

दीपिकासमोर टरकतो रणबीर

दीपिकासमोर टरकतो रणबीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता रणबीर कपूर आपल्या सहकलाकारांबरोबर मैत्रिपूर्ण स्पर्धा ठेवणं योग्य मानतो. पण एक अशीही व्यक्ती आहे जिच्याशी स्पर्धा करणं रणबीरला भीतीदायक वाटतं...

ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणीही नसून दीपिका पदूकोण आहे... होय, ही गोष्टी खुद्द रणबीर कपूरनंच मान्य केलीय. रणबीरच्या मते, बॉलिवूडमध्ये दीपिका ही एकच अभिनेत्री आहे जिला तो घाबरतो.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ’ये जवानी है दिवानी’मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका तब्बल पाच वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. एकेकाळी दोघांमध्ये अतिशय घनिष्ठ नातेसंबंध निर्माण झाले होते. ‘बचना ए हसींनों’ हा रणबीर आणि दीपिकानं एकत्र काम केलेला पहिला आणि शेवटचा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता.

रणबीर म्हणतो, ‘मला नेहमीच वाटत होतं की दीपिका ही बॉलिवूडमध्ये आगेकूच करणार... पण, हे माहीत नव्हतं की इतक्या लवकर ती एव्हढी चांगली कलाकार बनू शकेल. ती पहिलीच अभिनेत्री आहे जिला मी घाबरतो.’

‘मी दीपिकाला खूप चांगल्या पद्धतीनं ओळखतो. तिच्यातील उत्कृष्ठता आणि कमतरतेशीही मी परिचित आहे. परंतू, तीनं आपल्यातील कमतरतेलाच आपली ताकद बनवलंय आणि त्यामुळेच मी तिच्यासाठी खूप खूश आहे’ असंही रणबीरनं म्हटलंय.

अफवा या बॉलिवूडचा अविभाज्य भाग बनल्यात. लोकांना आपल्या आवडीच्या कलाकाराविषयी जाणून घेणं आवडतं. ते काय करतात? कुणाशी लग्न करतात? कुणाशी त्यांचं सूत जुळू शकतं किंवा नाही?... जेव्हा तुमच्याबद्दल अफवांना पेव फुटतं तेव्हा थोडं वाईट वाटतं. पण तेव्हा तुम्हाला तुमच्या कामावरच लक्ष द्यावं लागतं. शुक्रवारी जेव्हा सिनेमा प्रदर्शित होतो तेव्हा लोक सर्व काही विसरतात.

आपल्या सह-कलाकारांबद्दल बोलताना रणबीर म्हणतो, ‘मला नाही वाटत की त्यांच्यसोबत माझं काही शीतयुद्ध सुरू आहे. मला माझ्या पिढीतील सगळेच कलाकार आवडतात मग तो रणबीर सिंह असो किंवा शाहीद कपूर किंवा इमरान खान किंवा वरुण धवन... आम्ही ठरवून भेटत नसलो तरी एखाद्या पार्टीत भेट होतेच’

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 21, 2013, 12:08


comments powered by Disqus