कतरिना-रणबीर हातात-हात घालून फिरताना, ranbir kapoor and katrina kaifs private moment

फोटो : कतरिना-रणबीर हातात-हात घालून फिरताना

<B> <font color=red> फोटो : </font></b> कतरिना-रणबीर हातात-हात घालून फिरताना

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

कितीही प्रयत्न केला तरी प्रेम काही लपून राहत नाही म्हणतात ना तेच खरं... रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या लव्हबर्डसनं अनेकदा आपले संबंध सार्वजनिक करणं टाळलंयच... पण, त्यांचे फोटो मात्र सगळी कथा कथन करतात.

रणबीर कपूर आणि कतरिना एकत्र दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरात एकमेकांच्या हातात-हात घालून फिरताना दिसले. त्यांच्यात किती जवळिक आणि प्रेम आहे ते फोटो पाहून कुणाच्याही सहज लक्षात येईल.

रणबीर आणि कतरिना आपल्या आगामी सिनेमा ‘जग्गा जासूस’च्या शूटींगसाठी केपटाऊनमध्ये आहेत. दोघं एकत्रच खरेदीही करत आहेत. अशाच एका वेळी या दोघांना एकमेकांच्या हातात हात घालून खरेदी करताना पाहिलं गेलंय... त्यांचे हे फोटो सोशल वेबसाईटवर पोस्टदेखील झाली आहेत.

महत्त्वाचं म्हणजे, रणबीर आणि कतरिना यांना भारतात मात्र यापद्धतीनं कधीच पाहिलं गेलं नाही. दोघांच्या अफेअरची चर्चा जोरात असूनही कायम त्यांच्या नात्यावर एक प्रश्नचिन्ह दिसतं. काही दिवसांपूर्वीही कतरिना-रणबीरच्या समुद्र किनाऱ्यावरचे काही फोटो व्हायरल झाल्यामुळे कॅट चांगलीच नाराजदेखील झाली होती.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 3, 2014, 14:45


comments powered by Disqus