बॉलिवूडचा SEXIEST MAN ठरलाय रणबीर!, Ranbir Kapoor became a SEXIEST MAN in Bollywood

बॉलिवूडचा SEXIEST MAN ठरलाय रणबीर!

बॉलिवूडचा SEXIEST MAN ठरलाय रणबीर!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

सध्या बहुचर्चित ‘चेन्नई एक्सप्रेस’चा शाहरुख, दबंग सलमान खान, परफेक्शनिस्ट आमीर आणि हॉट अँड सेक्सी जॉन अब्राहम या साऱ्यांना मागं टाकत रणबीर ठरतोय नंबर वन. रणबीर नंबर वन बॉलिवूडचा अॅक्टर म्हणून नाही तर तो ठरलाय सेक्सिएस्ट मॅन नंबर वन.

आपल्या प्रत्येक सिनेमातून रणबीरनं प्रेक्षकांवर आणि खास करुन यंगस्टर्सवर आपली छाप पाडलीय. मग तो ‘वेक अप सिद’मधला लेझी लॅड असो की, ‘अजब प्रेम की गजब कहानी’तला प्रेमी, ‘राजनिती’मधला बेरक्या राजकारणी असो किंवा रॉकस्टार मधला गायक... आपल्या व्यक्तिरेखेनं रणबीरनं चाहत्यांच्या मनात घर केलंय.

मॅचोमॅनसारखी इमेज नसली, सिक्स पॅक-अॅब्स नसले तरीही रणबीर लाखो तरुणींच्या दिल की धडकन बनलाय, आणि याचं कारण म्हणजे त्याच्यात असलेलं अॅटीट्युड. स्वत: रणबीरसुद्धा हे कबूल करतो. “IF WOMEN DIDN`T LIKE ME I WOLUD FEEL THAT SOMETHING IS WRONG” असं खुद्द रणबीरचचं म्हणणं आहे. त्याच्या फॅन्सच्या संख्येत मुलींचं प्रमाण जास्त आहे.

यापुढंही रणबीरच्या फॅन्सच्या संख्येत मुलींची लिस्ट वाढतच जाईल असंच सध्या तरी दिसतंय. म्हणूनच म्हटलं की सलमान, शाहरुख, आमीर, जॉन साऱ्यांनाच मागं टाकत रणबीर ठरलाय SEXIEST MAN IN ASIA.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 13:58


comments powered by Disqus