Last Updated: Tuesday, May 14, 2013, 18:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईअभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्या गालांवर किस करायला मिळावं, यासाठी अभिनेता रणबीर कपूरने दिग्दर्शक अयान कपूरला चक्क लाच दिली, असं खुद्द रणबीर कपूरनेच उघड केलं आहे. रणबीर कपूरच्या ये जवानी है दिवानी सिनेमात माधुरी दीक्षितने एक आयटम साँग केलं आहे.
ये जवानी है दिवानी सिनेमात माधुरी दीक्षितने घागरा नावाचं आयटम साँग केलं आहे. या गाण्यात एकदा तरी माधुरी दीक्षितच्या गालांवर किस करायला मिळावं म्हणून रणबीर कपूरने दिग्दर्शक अयान मुखर्जीला हरतऱ्हेने पटवण्याचा प्रयत्न केला. रणबीर कपूर माधुरी दीक्षितचा जबरदस्त फॅन आहे. “माधुरी दीक्षित हे माझं पहिलं प्रेम आहे. जेव्हा तिचं लग्न झालं, तेव्हा मी खूप निराश झालो होते. मला जेव्हा माधुरी दीक्षितसोबत डान्स करण्याची संधी मिळाली, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला” असं रणबीर कपूरने म्हटलं.
माधुरी दीक्षितसोबत काम करण्याच्या अनुभवावर बोलताना रणबीर म्हणाला, “माधुरी दीक्षित खूप नम्र आणि टॅलेंटेड अभिनेत्री आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता.”
रणबीर कपूरच्या वडिलांनी म्हणजेच ऋषी कपूरने माधुरी दीक्षितसोबत अनेक सिनेमांत काम केलं आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 15:45