Last Updated: Saturday, June 29, 2013, 13:46
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई तुम्ही जर प्रेमात असाल आणि तुम्ही तुमच्या साथीदारास वेळ दिला नाही तर ! नक्कीच तुमच्यात भांडणे होऊ शकतात. शहरातील बऱ्याच प्रेमीजोडप्यांच्या भांडणाचे कारण हेच असते. अशा कारणावरून भांडणे बॉलीवुड जगतातही नवीन नाहीत. असं एक भांडण सध्या चर्चेचा विषय झालं आहे. रणबीरनं कॅटची मस्करी केली आणि कॅटचाच पाराच चढला.
असेच भांडण कतरिना आणि तिचा प्रियकर रणबीर यांच्यात झालंय. वृत्तपत्राच्या बातमीनुसार, बर्फी स्टार रणबीर कपूरने अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीच्यावेळी त्याच्या मित्रांसमोर त्याच्या प्रेयसीला तोंडघशी पाडलं. यामुळे कतरिना चिडली आणि त्या दोघांमध्ये भांडण झाली. त्यानंतर कतरिना तिथून तडक निघून गेली.
कतरिनाचं असं म्हणणं होतं की, रणबीरने पूर्ण वेळ तिच्यासोबत घालवावा मात्र रणबीर त्याच्या मित्रांसोबत वेळ घालवत होता. म्हणून रागाने कतरिना तिथून निघून गेली. या संमारंभात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, सिद्धार्थ कपूर, प्रियांका चोप्रा आणि अनेक बॉलिवूडचे कलाकार आले होते.
रणबीर यापूर्वी ‘ये जवानी है दिवानी’ मधील सहअभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत डेटिंगवर होता. परंतु या दोघांच्या नात्याचा ब्रेकअप झाल्यानंतर ही दोघ पुन्हा ये जवानी है दिवानी’ या सुपरहिट चित्रपटात ते पुन्हा एकदा एकत्र दिसलेत. रणबीर- दीपिका हे दोघं आता फक्त चांगले मित्र आहेत. दीपिका पदुकोण रामलीलामधील तिचा सहकलाकार रणवीर सिंग अर्जुन कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र फोटो काढताना दिसत होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, June 29, 2013, 13:46