रणबीर कॅमेऱ्यासमोर संपूर्ण नग्न व्हायला तयार! Ranbir Kapoor ready to go full monty!

रणबीर कॅमेऱ्यासमोर संपूर्ण नग्न व्हायला तयार!

रणबीर कॅमेऱ्यासमोर संपूर्ण नग्न व्हायला तयार!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`फुल और पत्थर` या सिनेमात धर्मेंद्रने आपलं उघडं अंग दाखवून पडजद्यावर एक नवं पर्व सुरू केलं होतं. पुरुषांचं अंगप्रदर्शन हे त्यानंतर प्रेक्षकांच्या पचनी पडू लागलं. आणि महिला चाहत्याही सिनेमाला गर्दी करू लागल्या. त्यानंतर शशी कपूर, ऋषी कपूर, जॉन आब्रहम आणि रणबीर कपूर यांनीही आपले नितंब पडद्यावर दाखवले.

रणबीर कपूर तर पूर्णपणे नग्न होऊन पडद्यावर वावरायलाही तयार आहे. खुद्द त्यानेच मान्य आहे. आपला पहिलाच सिनेमा सांवरियाँ मध्ये आपले नितंब त्याने दाखवले होते आणि यावर वाद झाला होता. मात्र त्याला याबद्दल काहीही वावगं वाटत नाही. तो संपूर्ण नग्न होऊन काम करण्यासही तयार आहे.

“मी कॅमेरासमोर अगदी निर्लज्जपणे वावरतो. मला दिग्दर्शकाने सांगितलं, तर मी पूर्ण नग्न होऊन सर्व कोनांमधून माझं शरीर दाखवायला तयार आहे. जेव्हा मी सावरियाँमध्ये नग्न दृश्य देत होतो, तेव्हा सेटवर अनेक अनोळखी लोक उभे होते. पण मला जराही संकोच वाटला नव्हता. या गोष्टीमुळे जर प्रेक्षक आकर्षित होत असतील, तर मी ते ही करायला कायम तयार आहे.” असं रणबीर कपूरने म्हटलं आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, May 16, 2013, 16:19


comments powered by Disqus