Last Updated: Friday, August 23, 2013, 16:14
www.24taas.com झी मीडिया, मुंबईस्पेनमध्ये आताच एकत्र वेळ घालून आलेले आणि युरोपियन ट्रीपमध्ये एकत्र असणारे बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि कतरीना कैफ हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
‘बेशरम’ या सिनेमाचे दिग्दर्शक अभिनाव काश्यप यांनी कतरीनाला या सिनेमासाठी घेण्याचा विचार केला होता. पण या सिनेमाचे फिल्म मेकरने नवीन येणारी पल्लवी शारदाला रणबीरसोबत काम करण्यासाठी या सिनेमात साइन इन केले होते.
एका वृत्तपत्रानुसार, कश्यप यांनी शारदाविषयी काही खास गोष्टी सांगितल्या. रणबीर कपूरने या सिनेमामध्ये त्याच्यासोबत कतरीना कैफने काम करावे, असे सांगितले होते. त्याचा या हट्टाला न जुमानता कश्यपने पल्लवी शारदाची निवड केली आहे.
आर. के आणि कतरीना यांनी ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या सिनेमात एकत्र काम केले आहे. त्यानंतर प्रकाश झा यांच्या राजकीय घटनेवर आधारीत अशा ‘राजनिती’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर ते दोघे परत कोणत्याही सिनेमात एकत्र दिसले नाहीत. आता त्यांना एकत्र काम करण्यासाठी थांबावे लागेल असे दिसते.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 23, 2013, 16:14