रणबीर-कतरिना राहणार लिव इनमध्ये, Ranbir Katrina meet architect to finalize plans for their first hom

रणबीर-कतरिना राहणार लिव इनमध्ये

रणबीर-कतरिना राहणार लिव इनमध्ये

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलिवूड स्टार रणबीर आणि कतरीना प्रेमाच्या चर्चेमध्ये आता एक बातमी आली आहे. हे दोघे लव बर्ड आता लिव-इन रिलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही आपल्या घराला सजविण्याच्या कामात व्यस्त आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार बुधवारी रणबीर आणि कतरिना या संदर्भात एका आर्किटेक्टला भेटायला गेले होते.

रणबीर आणि कतरिनाच्या जवळीकतेच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या. शेवटी त्या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी दोघे आर्किटेक्ट आणि डिझायनर आशीष शाह यांच्या ऑफिसमध्ये गेले होते.

दोघांचे वांद्रे येथील घर गेल्या दोन वर्षांपासून तयार होत आहे. पुढच्या वर्षापर्यंत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. रणबीर आणि कतरिना या भागात अचानक दिसल्याने उत्सुकता वाढली आहे. त्यांना पाहण्यासाठी फॅन्सने गर्दी केली होती. लोकांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी धाव घेतली होती.

रणबीरने अनेकांचे हास्यवदनाने भेट घेतली, तर कतरिना शाह यांच्या ऑफिसमध्येच होती. रणबीर ३२ वर्षी पाली हिल येथील आपल्या कुटुंबियांचे घर सोडणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्याचे कारणही कतरिना होती. दुसरीकडे शाह या प्रकरणात कोणतीही माहिती देत नाही आहे. या दोन्ही स्टारमधील जवळीकता पाहिल्या लवकरच दोघे सरप्राईज देऊ शकतात.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 1, 2014, 16:22


comments powered by Disqus