३०कोटींच्या ‘बर्फी’ची कमाई १०० कोटी , Ranbir, Priyanka and Ileana`s `Barfi!`

३०कोटींच्या ‘बर्फी’ची कमाई १०० कोटी

३०कोटींच्या ‘बर्फी’ची कमाई १०० कोटी
www.24taas.com,मुंबई

बॉलिवूड क्षेत्रात चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत नाही, अशी मारण्यात येणारी बोंब चुकीची ठरत आहे. रणवीर कपूरचा ‘बर्फी’ने १०० कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. हा चित्रपट ३० कोटी रूपयांमध्ये तयार करण्यात आला होता.

सलमान खानचे दबंग, टायगर, बॉडीगार्ड तर परिणीती चोप्राचा इश्क जादे या चित्रपटांनी १०० कोटी रूपयांचा गल्ला पहिल्या महिन्यात जमा केला होता. १४ सप्टेंबरला ‘बर्फी’ रिलीज झाला. त्याने पहिल्या तीन दिवसांतच ३४.६ कोटी कमावले होते. त्यानंतर पहिल्या आठवड्यात ५८कोटी कमावले. आता तर १०० कोटींचा टप्पा पार केला असून, अजूनही तो हाऊसफुल चालत आहे.

या वर्षी अग्निपथ, हाऊसफुल्ल-२, रावडी राठोड, बोल बच्चन आणि एक था टायगरने १०० कोटी कमावले होते; त्यात आता या चित्रपटाचा समावेश झाला आहे. सर्व खान मंडळींबरोबर रणबीर कपूरनेही सुपर हिटच्या रांगेत स्थान मिळविले आहे.

First Published: Thursday, October 4, 2012, 10:52


comments powered by Disqus