Last Updated: Thursday, May 23, 2013, 09:25
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई आपली पूर्व प्रेयसी आणि ‘जवानी है दिवानी’ची सहकलाकार दीपिका पदूकोण हिच्या मुलांचा गॉडफादर बनायचंय, अशी इच्छा व्यक्त केलीय ‘दी रणबीर कपूर’नं...
फक्त एव्हढंच नाही तर दीपिकाच्या अजून जन्म न घेतलेल्या मुलांच्या सोबत रणबीरला सहकलाकार म्हणून काम करण्याचीही इच्छा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गॉडफादर बनायचंय म्हणजे नक्की काय? तर रणबीर या प्रश्नावर उत्तर देतो की, गॉडफादरचा अर्थ होतो एक असा व्यक्ती जी तुम्हाला प्रिय आहे आणि मुलांनी त्यांच्याशी सल्ला-मसलत करावी आणि आपले मार्ग निवडावे.
दीपिका आणि रणबीरच्या वागण्यातून तर असंच प्रतीत होतंय की दोघंनीही आपला भूतकाळ विसरून भविष्याकडे वाटचाल केलीय. सिनेमाच्या शूटींग दरम्यान आणि प्रमोशन दरम्यान एकमेकांसोबत घालवलेला वेळ दोघांनाही हवाहवासा वाटतोय. दोघांनीही एकमेकांच्या असण्याचा आनंद घेतलाय. दोघं शूटींगदरम्यानही अगदी सहज वावरत होते. रणबीर आणि दीपिका तब्बल पाच वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, May 23, 2013, 09:25