दीपिकानं रणबीर कपूरबद्दल सांगितलं रणवीरला!Ranveer, Deepika talked about Ranbir during their date?

दीपिकानं रणबीर कपूरबद्दल सांगितलं रणवीरला!

दीपिकानं रणबीर कपूरबद्दल सांगितलं रणवीरला!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या एक्स-पार्टनरबद्दल सध्याच्या पार्टनरला सांगणं हे आपण ऐकलं असेलच... यातच आता नाव जोडलं गेलंय ते दीपिका पदुकोणचं... दीपिकानं रणवीर सिंहसोबत डीनर डेटला आपला आधीचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरबद्दल सांगितल्याची माहिती मिळतेय.

एका दैनिकानुसार दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे लव्ह बर्ड्स गोव्यातल्या वॅगेटर बीचवरील एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये रविवारी डीनरला गेले होते. तिथं त्यांनी जेवणासोबतच दीपिकाचा एक्स रणबीर कपूरबद्दलही चर्चा केल्याचं कळतंय.
दीपिका रणबीर कपूर आणि तिच्या प्रेमाबद्दल नाही तर रणबीर कपूरचा नुकताच बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेल्या ‘बेशरम’बद्दल बोलल्याची माहिती मिळतेय.

दीपिका-रणवीर सध्या गोव्यात ‘Finding Fanny Fernandes’ या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. ‘रामलीला’मध्येही या दोन लव्ह बर्ड्सना एकत्र वेळ घालवायला मिळालाय. डीनरला गेलेल्या या दोघांचं हे संभाषण म्हणजे त्यांच्या टेबलजवळ गेलेल्या अनेकांनी मीडियाला सांगितलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 23, 2013, 09:36


comments powered by Disqus