रणवीर म्हणजे तारूण्यातला अमिताभ?

रणवीर म्हणजे तारूण्यातला अमिताभ?

रणवीर म्हणजे तारूण्यातला अमिताभ?

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेता रणवीर सिंहने आपल्या भूमिकांच्या माध्यमातून अनेकांचं लक्ष वेधलं आहे. बँड बाजा बारात, लेडीज वर्सेस रिकी बहल आणि लुटेरा सारख्या चित्रपटातून त्याने आपण उत्कृष्ट अभिनय करू शकतो, असं सिद्ध केलं आहे.

यावर बोलतांना रणीवर म्हणाला, एका चाहत्यानं मला सांगितलं की अमिताभचा सुरूवातीचा काळ तुला पाहून आपल्याला आठवला.

ही माझ्या भूमिकेसाठी सर्वात मोठी प्रशंसा असल्याचं रणवीरने म्हटलं आहे. ही बाब माझ्यासाठी खूप मोठी आहे. कारण चित्रपट जगतात येण्याची प्रेरणा मला अमिताभ बच्चनपासूनच मिळाली.

मी लहानपणी चित्रपट पाहत होतो. या चित्रपटातील अभिनेता जे काही करत होता, ते आपल्याला करण्याची इच्छा होती, आणि त्यात अमिताभ बच्चन हेच माझ्यासाठी एकमेव हिरो होते, असंही रणवीरने म्हटलं आहे.

आपलं काम पाहून प्रेक्षक आपलं निश्चित कौतुक करतील, असा आत्मविश्वासही रणवीरला आहे. गुंडे चित्रपटात रणवीर बिक्रमची भूमिका पार पाडतोय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, February 16, 2014, 17:55


comments powered by Disqus