Last Updated: Monday, March 24, 2014, 20:00
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसेलिब्रिटी सध्या शॅम्पूपासून क्रिमपर्यंत अनेक गोष्टींचा प्रचार करणे ही साधारण गोष्ट आहे. परंतु, आतापर्यंत कोणत्याही सेलिब्रिटीने कंडोमची जाहिरात केलेली नाही. ज्या देशात आजही सेक्स संदर्भात उघडपणे बोलण्यास लोक लाजतात. परंतु, एक असा अभिनेता आहे, त्याने चक्क कंडोमची जाहिरात करण्याची तयारी दर्शवली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तो आहे बॉलिवुडचा ढासू मॅन रणवीर सिंह....
लवकरच आपल्याला रणवीर सिंह एका कंडोमची जाहिरात करताना दिसणार आहे. अशी जाहिरात करणारा मेनस्ट्रीममधील तो पहिला अभिनेता ठरणार आहे. रणवीर सिंहनुसार ‘सेफ सेक्स’ला प्रोत्साहन देण्यासाठी ही जाहिरात करणार आहे. यामुळे समाजाचे भले होणार आहे. या जाहिरातीची शुटिंग ३० आणि ३१ मार्चला होणार असून फिमेल मॉडेलसाठी ऑडिशन सुरू आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 24, 2014, 18:22