Last Updated: Wednesday, February 20, 2013, 13:35
www.24taas.com, दुबईबॉलिवूडमधील नव्या अफेर्सची चर्चा नेहमीच सुरू असते. आणि ती चर्चा रंगते सुद्धा अगदी खुसखुशीत अशीच... या नव्या अफेयर्सबाबत बॉलिवूडमध्येही देखील उत्सुकता लागून राहिलेली असते.. मात्र ही काही नवी गोष्ट नाही की, दीपिका पदुकोणचं पहिल्यांदा नाव घेतलं जात आहे.
या पहिलेही दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्यात काहीतरी गुफ्तगू सुरू होतं. तर आता रणवीर सिंगसोबत तिचं नाव जोडलं जातं आहे. रणवीर सिंग आणि दिपिका पदुकोण यांचा हा फोटो पाहून तुम्हांलाही असचं वाटत असेल. दिपिका आणि रणवीर यांच्यात नक्कीच काहीतरी सुरू आहे. ह्याबाबत बॉलिवूडमध्ये चर्चा सुरू आहे.
या फोटोत दोघे दुबईच्या नाईट क्लबमध्ये किस करताना कॅमेऱ्यात कैद झाले. दिपिका आणि रणवीर दोघंही दुबईत डेटवर गेले असल्याची चर्चा होती. आता तर हा फोटो पाहून सारं चित्र स्पष्ट झालं आहे.
First Published: Wednesday, February 20, 2013, 08:17