Last Updated: Saturday, October 13, 2012, 16:08
www.24taas.com, मुंबईसोनाक्षी सिन्हा ‘दबंग गर्ल’ बनून बॉलिवूडमध्ये दाखल झाल्यापासून तिच्या रूपाची तुलना जुन्या जमान्यातली अभिनेत्री रीना रॉयशी करण्यात येत आहे. सोनाक्षीचे वडील शत्रुघ्न सिन्हा आणि रीना रॉयचं त्या जमान्यात बहरलेल्या प्रेम प्रकरणाचं सोनाक्षी हे फळ असल्याचीही शक्यता बऱ्याच जणांनी वर्तवली. म्हणजेच सोनाक्षी ही रीना रॉयचीच मुलगी असावी, असा काहीजणांचा कयास आहे.
पण खुद्द रीना रॉयने या बातमीला नकार दिला आहे. सध्या आपली मुलगी सोनम हिच्याबरोबर राहात असलेल्या रीना रॉ,चा माजी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खान याच्याशी घटस्फोट झाला आहे. रीना रॉयने मात्र सोनाक्षीच्या दिसण्याचं आपल्या दिसण्याशी काहीच साम्य नसल्याचं म्हणणं आहे. रीना रॉयचं म्हणणं आहे, की सोनाक्षी तिच्या आईसारखी म्हणजेच पूनम सिन्हासारखी दिसते.
एवढंच नाही, तर रीना रॉयचं असंही म्हणणं आहे की, सलमान खानने सोनाक्षीला अगदी भारतीय रूपात सादर केल्यामुळे ती आपल्यासारखी दिसत असल्याचं लोकांना वाटतं. शेवटी रीना रॉय असंही म्हणाली, “मी जेव्हा ज़ख्मी सिनेमा केला, तेव्हा लोक मी आशा पारेख आणि नासिर हुसेन यांची मुलगी असल्याचा दावा करू लागले होते. फिल्म इंडस्ट्रीत अशा अफवा उठतच असतात. काही दिवस अशा अफवा उठतात, नंतर बंद होतात.”
First Published: Saturday, October 13, 2012, 16:08