Last Updated: Saturday, September 29, 2012, 09:40
www.24taas.com, मुंबईऑस्कर पुरस्कार प्राप्त संगीतकार ए.आर. रहमान यांने आपल्या हिंदी सिनेमातील संगीत क्षेत्रातील काम पूर्ण झाल्याचं विधान केलं आहे. यश चोप्रा दिग्दर्शित आगामी ‘जब तक है जान’ या सिनेमासाठी रहमानने संगीत दिलं आहे. ‘यश चोप्रांसाठी संगीत दिल्यावर संगीतकार म्हणून आज खऱ्या अर्थाने माझं हिंदीतील काम पूर्ण झालं’, असं रहमान म्हणाला.
46 वर्षीय रहमान यांनी गुरूवारी रॉयल स्टॅग मेगा म्युझिक कार्यक्रमात याविषयी घोषणा केली. “यश चोप्रांनी लंडनमध्ये माझी एक मैफिल पाहिली होती. त्यानतर त्यांना मी ‘जब तक है जान’मध्ये सहभागी होणं आवश्यक वाटलं. मलाही ही फिल्म स्वीकारताना खूप आनंद झाला. कारण मी यापूर्वी मी कधीच त्यांच्यासोबत काम केलं नव्हतं. त्यांच्यासोबत काम करून मला हिंदी सिनेमातील माझं संगीत क्षेत्रातील माझं कार्य पूर्ण झालंय असं समजतो.” असं रहमान म्हणाला.
रहमान म्हणाला, त्यांच्यासोबत काम करण्याचा एकंदर अनुभव छान होता. माझ्या संगीतावर यश चोप्रा खूश आहेत. प्रेक्षक आणि श्रोतेही संगीत ऐकून आनंदी होतील, अशी आशा रहमानने व्यक्त केली. कित्येक वर्षांपासून मी असं संगीत देण्याचा प्रयत्न क रत होतो. अखेर मला असं संगीत देणं शक्य झालं. यापूर्वी ताल आणि स्वदेसमध्ये या पद्धतीचं संगीत दिलेलं होतं. ‘जब तक है जान’ 13 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.
First Published: Saturday, September 29, 2012, 09:40