नजरबंदी करणारा ABCD Review- ABCD

नजरबंदी करणारा ABCD

नजरबंदी करणारा ABCD
www.24taas.com, मुंबई

रेमो डिसूझा दिग्दर्शित ABCD हा सिनेमा भेटीला आला आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे अर्थातच भन्नाट नृत्य प्रकार. हा सिनेमा ३ डी असल्यामुळे तर हे अचाट नृत्यप्रकार जास्त चित्ताकर्षक ठरतात. यामुळेच हा सिनेमा नजरबंदी करून ठेवतो.सबकुछ डान्स असलेल्या ABCD च्या प्रेमात डान्सर्स पडले नसते तरचं नवल.

डान्स पॅशन असणा-या विष्णूला काही मतभेदांमुळे डान्स अँकडमी सोडायला लागते, आणि मग इथूनच सुरु होतो डान्स हेच एकमेव जगण्याचं साधन असलेल्या विष्णूचा लढा.. या सिनेमातील सर्व नृत्यप्रकार अक्षरश: थक्क करणारे असेच आहेत.

त्याशिवाय कोरिओग्राफर टर्न डायरेक्टर झालेल्या रेमोचं डिरेक्शन वेगळेपणा जपतं जे स्टोरीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतं. तर ऍज युजवल प्रभुदेवा आपल्या डान्सींग स्टाईलनं प्रेक्षकांना थिरकवतो.

या सिनेमातील चेहरे नवे असले, तरी प्रेक्षकांच्या ओळखीचे आहेत. वेगवेगळ्या डान्स रिऍलिटी शो मध्ये या डान्सर्सना आपण पाहिलं आहे. त्यांच्यासोबत प्रभुदेवाचा डान्स बघणं खरंच प्रेक्षणीय अनुभव आहे.

मात्र, या सिनेमात डान्सव्यतिरिक्त काही नाही. त्यामुळे, तुम्ही इतर काही अपेक्षा घेऊन गेलात, तर तुमचा भ्रमनिरास होण्याची शक्यता आहे. केवळ डान्सची आवड असणाऱ्यांनाच हा सिनेमा आवडू शकेल. मात्र, भारतीय तरुणांमधील नृत्याचं टॅलेंट ३ डी स्टाइलमध्ये बघण्याची दुर्मिळ संधी या सिनेमाद्वारे मिळत आहे. ती न सोड़लेलीच चांगली...

First Published: Saturday, February 9, 2013, 01:35


comments powered by Disqus