माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही - कंगना,`Revolver Queen` after seeing no one will marry me : Kangana

`रिव्हॉल्वर राणी`पाहून माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही - कंगना

`रिव्हॉल्वर राणी`पाहून माझ्याशी कोणीही लग्न करणार नाही - कंगना
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही सध्या आपला नवा चित्रपट ‘रिव्हॉल्वर राणी’ मुळे चर्चेत आहे. तिने तर धक्कादायक विधान केले आहे. माझा हा सिनेमा कोणी पाहिला तर माझ्याशी कोणीही विवाह करू शकत नाही. तिने असे विधान केल्याने या सिनेमात असं काय आहे, याची उत्सुकता अनेकांना आहे.

या चित्रपटात कंगना आणि त्याचा को-स्टार वीर दासच्या एका जबरदस्त ‘किस’बद्दल मायनगरी चर्चेला उधाण आले आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी कंगना हिने वीर दासला अशा प्रकारे किस्स केले, की त्याच्या ओठातून रक्त वाहू लागले. चित्रपटातील एका सीनमध्ये कंगनाला अटक करून जेलमध्ये घेऊन जाताना दाखविले आहे. या दरम्यान एका महत्वाचे काम सांगून वीर दासला एका रूममध्ये ओढून घेऊन जाते. त्यावेळी असा काही किस घेते की त्याच्या ओठातून रक्त वाहू लागते.

कंगनाचा हा चित्रपट २५ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटात कंगना दबंग आणि सनकी स्वभावाची आहे. यापूर्वीच्या कंगनाच्या `रिव्हॉल्वर राणी` चित्रपटात अत्यंत उलट भूमिका वढवली आहे. 27 वर्षीय कंगनाने सांगितले की, या सिनेमाची पटकथा ऐकताना माझ्यासोबत माझी बहिण होती. तिने या सिनेमात भूमिका करू नको, असा सल्ला दिला. कारण यामध्ये माझी आक्रमक आणि भयानक भूमिका आहे. त्यामुळे ही भूमिका स्वीकारणे मोठे अडचणीचे आहे. मात्र, मी याचे आव्हान स्वीकारले आणि काम केले. तिने यावेळी हसत हसत सांगितले, ही सिनेमा पाहिल्यानंतर कोणीही माझ्याशी लग्न करणार नाही.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 09:07


comments powered by Disqus