तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा थिरकणार ऋषी कपूर, rishi kapoor dancing in chashmebaddur

तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा थिरकणार ऋषी कपूर

तब्बल ३६ वर्षांनी पुन्हा थिरकणार ऋषी कपूर
www.24taas.com, नवी दिल्ली

‘चश्मेबद्दूर’ या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून ऋषी कपूर पुन्हा एकदा थिरकताना पाहायला मिळणार आहेत.

यापूर्वी आपण ऋषीला १९७७ मध्ये आलेल्या ‘हम किसी से कम नही’ या चित्रपटात ‘मिल गया हमको साथी’ या गाण्यावर ताल धरताना पाहिलं होतं. त्यानंतर आता बॉलिवूडच्या ज्येष्ठ नेत्यांच्या श्रेणीत प्रवेश केलेल्या ६० वर्षीय ऋषी कपूर यांना तब्बल ३६ वर्षानंतर पुन्हा एकदा ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटात थिरकताना प्रेक्षक पाहणार आहेत. ‘अर्ली मॉर्निंग’ या गाण्याच्या तालावर त्याची पावलं थिरकणार आहेत. ऋषी कपूर या सिनेमात फक्त नाचणारच नाही तर प्रसिद्ध हार्ले डेव्हिडसन बाईक चालवतानाही दिसेल.

ऋषीनं ‘चश्मेबद्दूर’मध्ये मस्तच डान्स केलाय, असं सांगितलं जातंय. कदाचित, हा डान्स आपल्याला ‘हमको साथी मिल गया’ गाण्यातील सफेद कपड्यांतील ऋषीची आणि त्याच्या डान्सचीही आठवण करून देईल. १९८१ च्या ‘चश्मेबद्दूर’चा हा रिमेक असणार आहे. सिद्धार्थ, दिव्येंद्रू शर्मा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री तापसी पन्नू यांनी या चित्रपटात अभिनय केलाय. ‘१८ मोशन पिक्चर’ बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलंय. येत्या पाच एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला दाखल होईल.

First Published: Saturday, March 2, 2013, 13:47


comments powered by Disqus