Last Updated: Tuesday, August 13, 2013, 18:07
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या दणकेबाज ओपनिंग आणि १०० कोटींच्या कमाईच्या नव्या रेकॉर्डनं दिग्दर्शक रोहित शेट्टीचा विश्वास वाढवलाय. अपेक्षेपेक्षा कमी वेळात आणि सगळ्यात फास्ट १०० कोटींचा आकडा पार करण्याचा विक्रम चेन्नई एक्स्प्रेसनं केलाय.
मात्र यशाचं श्रेय फक्त शाहरुख आणि दीपिकाला देणं चुकीचं आहे. कारण रोहित शेट्टीनं दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांकडे आपण जर बघितलं. तर आपल्या हे लक्षात येईल की, रोहितचा हा चवथा चित्रपट आहे, ज्यानं १०० कोटींचा टप्पा ओलांडलाय.
गोलमाल ३, सिंघन, बोल बच्चन या तीन सिनेमांनंतर चेन्नई एक्स्प्रेस रोहित शेट्टीचा चवथा चित्रपट आहे. ज्यानं १०० कोटीचा आकडा पार केलाय. या आकड्यांवरुन हेच लक्षात येतं ती, १०० कोटी क्लबचा खरा राजा हा रोहित शेट्टीच आहे.
बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचं नाव प्रेक्षकांना फूल एंटरटेन करणारा दिग्दर्शक म्हणून घेतलं जातं. बॉक्स ऑफिसवर धूम माजवणाऱ्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात रोहितनं रोमांस सोबतच अॅक्शनचा तडका दिलाय. त्याच्या दिग्दर्शनाला काही तोड नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, August 13, 2013, 15:20