पुन्हा १०० करोड... ‘दबंग’खानचं डबल सेलिब्रेशन!, Rs 100 crore gift for birthday boy Salman ‘Dabangg’ Khan

पुन्हा १०० करोड... ‘दबंग’खानचं डबल सेलिब्रेशन!

पुन्हा १०० करोड...  ‘दबंग’खानचं डबल सेलिब्रेशन!
www.24taas.com, मुंबई

आजचा सलमान खानचा वाढदिवस... ‘माझा जन्म हेच माझ्यासाठी मोठं गिफ्ट’ असं म्हणणाऱ्या सलमानसाठी आजचा दिवस नक्कीच लकी ठरतोय. वाढदिवसाबरोबरच त्याला सेलिब्रेशनसाठी आज आणखी एक गिफ्ट मिळालंय. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘दबंग २’ शंभर करोड क्लबमध्ये एन्ट्री मिळवलीय.

सलमानचा भाऊ अरबाझ खान यानं हा सिनेमा दिग्दर्शित केलाय आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शंभर करोडोंची कमाई करणारा ‘दबंग-२’ हा २०१२ सालचा शेवटचा चित्रपट ठरलाय. सोनाक्षी सिन्हा, प्रकाश झा, विनोद खन्ना, अरबाझ खान आणि करीना कपूर अशा सगळ्याच कलाकारांना प्रेक्षकांनी सुपरलाईक केलंय. जागतिक पातळीवरदेखील ‘दबंग २’ हीट ठरलाय.

‘दबंग २’ या सिनेमानं प्रदर्शनानंतरच्या अवघ्या तीन दिवसांत ६४ करोड रुपयांची कमाई केली होती. त्यावेळीच हा सिनेमा शंभर करोडच्या घरात सहज प्रवेश मिळवू शकेल, याचा अनेकांना अंदाज आला होता.

वाढदिवसाच्या दिवशीच सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश मिळाले होते, पण आज कोर्टात उपस्थित न राहण्याची परवानगीदेखील त्याला मिळालीय. नक्कीच ‘दबंग – २’च्या यशाच्या या बातमीमुळे ‘बर्थडे बॉय’ सलमानचा आनंद तिप्पट होईल. हॅपी बर्थडे सलमान...

First Published: Thursday, December 27, 2012, 16:51


comments powered by Disqus