Last Updated: Tuesday, May 13, 2014, 16:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसैफ अली खानला पाहून करिनाला कपूरला तिचे हसू अनावर झालं, कारण सैफ अली खानने आपला चेहऱ्यावर केलेली रंगभूषा पाहून करिनाला हसू आवरत नव्हतं.
खरंतर असं झालं की, सैफ अली खान हा `हमशकल्स` चित्रपटात तिहेरी भूमिका साकारत आहे. याच चित्रपटात त्याने महिलेचे रुपही धारण केले होते. हे पाहून करिनाला तिचे हसू
अनावरण झाले आणि ती अक्षरशः पोट धरून हसू लागली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा सैफ त्याचा पोशाख घालून मेकअप करण्यासाठी व्हॅनमधून बाहेर आला, तेव्हा करीना तिचे हसू थांबवूच शकली नाही. सैफ महिलेच्या वेशात शूटींग
करणार असल्याचे कळल्यापासून गेले काही दिवस करिना `हमशकल्स`च्या सेटवर जात होती.
सैफच्या या रुपाबाबत ती फार उत्साहित होती. पण, जेव्हा सैफ महिलेच्या पोशाखात समोर आला तेव्हा ती हसूनहसून लोटपोट झाली. `हमशकल्स`मध्ये रितेश देशमुख, राम कपूर,
बिपाशा बसू, तमन्ना भाटिया आणि ईशा गुप्ता यांच्याही भूमिका आहेत. वाशू भगनानी निर्मित `हमशकल्स` २० जूनला प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 13, 2014, 16:52