‘सैफिना’चा ४८ करोड रुपयांचा बंगला!, SAIFINA`S 48 corers banglaw

‘सैफिना’चा ४८ करोड रुपयांचा बंगला!

‘सैफिना’चा ४८ करोड रुपयांचा बंगला!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडची हॉट जोडी सैफ अली खान आणि करीना कपूर यांना आपला नवा ‘आशियाना’ सापडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, सैफिनानं तब्बल ४८ करोड रुपयांमध्ये एक नवा बंगला विकत घेतलाय.

गेल्या अनेक दिवसांपासून करीना आणि सैफ मुंबईतील बांद्रा भागात राहत आहेत. सैफला हा भाग खूप आवडतो. त्याला हा भाग सोडून इतरत्र कुठेही जाण्याची इच्छा नाही... आणि तशी संधी मिळाल्यानंतर सैफिनानं ही संधी काही दवडली नाही. सध्या राहत असलेल्या बंगल्यासमोर हा नवीन बंगला आहे.

सैफ आणि करीनानं याच भागात एकाच बिल्डिंगमधील चार मजले विकत घेतलेत. ज्यामध्ये प्रत्येक मजल्यावर एक थ्री बीएचके अपार्टमेंट आहे. यातील प्रत्येक फ्लॅटची किंमत जवळजवळ १२ लाख रुपये आहे.

सैफ अली खानला आपल्या या घराबद्दल खूपच उत्सुकता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सैफनं आपल्या या नव्या घरात टेरेस गार्डन आणि एका मजल्यावर स्वीमिंग पूल आणि जिमही बनवायचंय. इतकंच नाही, तर त्याला आपलं ऑफिसही इथंच शिफ्ट करायचंय.

सध्या, करीना आणि सैफ ‘फॉर्च्युन हाईटस्’मध्ये राहत आहेत. इथं दोन अपार्टमेंट आहेत. त्यामधलं एक घर म्हणून वापरलं जातं तर दुसरं सैफचं प्रोडक्शन हाऊसचं ऑफिस आहे.

आपल्या नव्या घराच्या डिझाईनची संपूर्ण जबाबदारी करीना कपूर सांभाळणार आहे. २०१४ च्या मध्यापर्यंत या बिल्डिंगचा एक मजला तयार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यानंतर सैफिना तिथं शिफ्ट होतील.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 13:21


comments powered by Disqus