Last Updated: Friday, November 30, 2012, 16:43
www.24taas.com, मुंबईबॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने नेहमीच आपल्या वागण्यामुळे वाद ओढावून घेतले. यापूर्वी तुरूंगाची हवा खाल्लेल्या संजय दत्तने कालांतराने सिनेक्षेत्रात पुन्हा येऊन आपलं नाव रोशन केलं खरं.. पण पुन्हा एकदा त्याने त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंबाला नाराज केलं.
दिवंगत अभिनेत्री आणि संजय दत्त याची आई नर्गिस दत्त यांच्या नावाने सुरू केल्या गेलेल्या नर्गिस कॅन्सर फाऊंडेशनला संजय दत्त याने आपल्या बहिणींसोबत भेट दिली. या प्रसंगी कॅन्सरपासून दूर राहाण्याचा आणि कॅन्सरशी लढण्याचा सल्लाही संजय दत्त याने उपस्थितांना दिला. मात्र यानंतर काही वेळाने खुद्द संजय दत्तनेच एक तंबाखू मिश्रीत गुटख्याचं सर्वांसमोर सेवन केलं.
गुटख्यामुळे कॅन्सर होतो, याची सूचना गुटख्याच्या पाकिटावरही लिहीली जात असताना संजय दत्त याने कॅन्सर फाऊंडेशनमध्ये येऊन गुटखा खाणं हे लज्जास्पद असल्याचं त्याच्या उपस्थित चाहत्यांनी म्हटलं. यामुळे त्याच्या कुटुंबालाही लज्जित व्हावं लागलं. तसंच आपली आई कॅन्सरमुळे निधन पावल्याचं दुःख व्यक्त करणाऱ्या संजय दत्तने स्वतःच एका पान मसाल्याचीही जाहिरात केली आहे. त्यामुळे संजय दत्तचा कॅन्सरशी लढण्याचा उपदेश म्हणजे केवळ ‘लोका सांग ब्रह्मज्ञान...’ असल्याचं दिसून आलं.
First Published: Friday, November 30, 2012, 16:42