युवराजनंतर आता त्याचे वडिलही झगडतायत कॅन्सरशी

Last Updated: Friday, June 6, 2014, 18:20

क्रिकेटर युवराज सिंह हा दोन वर्षांपूर्वीच कॅन्सरशी दोन हात करून सुखरुप बाहेर पडलाय. पण, आता त्याचे वडील योगराज सिंह यांनाही कॅन्सर झाल्याचं निदान झालंय.

तंबाखू प्रत्यक्षात कर्करोग बरा करतो?

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 15:30

तंबाखू आणि कॅन्सरचं खूप जवळचं नातं आहे. तंबाखूमुळं तोंडाचा कॅन्सर होतो ते टाळा हे आपल्याला माहितच आहे. मात्र काही संशोधकांच्या मते तंबाखूच्या झाडांच्या पानात कॅन्सरचा नाश करण्याचं मेकॅनिझम आहे. एका रेणूवर NaD1 जो की तंबाखूच्या फुलांमध्ये असतो जे बॅक्टेरिया आणि बुरशीसोबत लढतो.

पहिल्या टप्प्यातच मिळणार कॅन्सरवर उपाय

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 12:49

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनमधील संशोधकांनी लावलेल्या नव्या पद्धतीच्या संशोधनानुसार, रक्ताच्या चाचणीत अनेक प्रकारच्या कर्करोगांच्या संसर्गाची माहिती मिळणार आहे.

सोशल नेटवर्किंग साईटवर `इन्स्टोग्रॅनी`ची धम्माल!

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 15:15

सोशल नेटवर्किंग वेबसाईट इन्स्टाग्रामवर ८० वर्षांच्या एका आजीबाईंना बॅटी सिम्पसन यांना त्यांचे चाहते प्रेमानं `इन्स्टोग्रॅनी` म्हणून बोलावतात. याचं कारणही तसंच आहे. केवळ दोन महिन्यात या इन्स्टोग्रॅनीनं ८६ हजारांहून जास्त फ्रेंडस् बनवलेत.

मोबाईलने होत नाही कॅन्सर, संशोधकांचा दावा

Last Updated: Friday, February 14, 2014, 16:06

प्रकृतीशी संबंधीत समस्यांचे आणि मोबाईल फोनचा काही संबंध नसल्याचा मोठा खुलासा मोबाईल टेलीकम्युनिकेशन अँड हेल्थ रिसर्च (एमटीएचआर) च्या संशोधनात करण्यात आला आहे.

कँन्सरशी लढणाऱ्या अयानवर यशस्वी शस्त्रक्रिया!

Last Updated: Thursday, January 16, 2014, 18:29

अभिनेता इम्रान हाश्मी याच्या चार वर्षांच्या कोवळा मुलगा – अयान कँन्सरशी लढतोय. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडलीय. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याचं सांगण्यात आलंय.

इम्रानच्या कोवळ्या अयानला कँन्सर

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 16:06

बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सध्या त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठिण प्रसंगाला सामोरा जाताना दिसतोय. एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार, इम्रानच्या चार वर्षांच्या चिमुकला – अयानला कँन्सरसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करतोय.

त्वचेचा कॅन्सर ओळखणारं मोबाईल अॅप!

Last Updated: Monday, December 23, 2013, 10:32

आयआयटी खरगपूरच्या विद्यार्थ्यांनी मेडिकल सायन्सला मदत करणारं एक मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केलं सून त्यामुळं त्वचेच्या कॅन्सरचं निदान करणं सोपं होणार आहे.

कॅन्सरग्रस्त मुलांना कोकण रेल्वेने घडविले गोवा दर्शन

Last Updated: Saturday, November 30, 2013, 10:33

आपल्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद-भरारी आणण्यासाठी कोकण रेल्वेने कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मुलांला गोवा दर्शन घडविले आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये ही मुलं सध्या उपचार घेत आहेत.

सनस्क्रीन वापरा, त्वचेचा कॅन्सर टाळा!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 13:27

सनस्क्रीनमुळं तीन प्रकारच्या त्वचेच्या कॅन्सरचं १०० टक्के रक्षण केलं जातं. त्यासोबतच आपल्या त्वचेचं आनुवंशिकतावाहक म्हणजेच ‘सुपरहीरो जीन’चं सुद्धा संरक्षण सनस्क्रीनमुळं होतं, असं नुकतंच एका अभ्यासात पुढं आलंय.

आता कॅन्सरही बरा होऊ शकतो

Last Updated: Monday, September 9, 2013, 16:06

आपण लहानपणापासून एकच गोष्ट विज्ञानाच्या पुस्तकात शिकत आलो आहोत. ती म्हणजे आपल्या शरीरात एक रोग प्रतिरोधक पेशी असते. ही पेशी आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, होणाऱ्या रोगांपासून आपलं संरक्षण करण्याचं काम करते. पण आताच वैज्ञानिकांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कॅन्सरला नष्ट करणाऱ्या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे.

स्तनपान केल्याने कॅन्सरचा धोका कमी

Last Updated: Wednesday, August 21, 2013, 15:32

सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत स्तनपान करणाऱ्या महिलांना स्तन कॅन्सरचा धोका कमी होता, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ज्या माता सिगारेट ओढत असतील त्यांच्याबाबत ही बाब लागू होत नाही.

कडूलिंबाने वाढते रोगप्रतिकारक क्षमता

Last Updated: Thursday, August 15, 2013, 15:36

गेल्या काही वर्षांपासून कडूलिंब ही वनस्पती आपण औषधी वनस्पती म्हणून ओळखतो. पण आता सध्या अस्तित्वात असणारा जीवघेणा आजार म्हणजे कॅन्सरसाठी देखील कडूलिंब ही वनस्पती रामबाण ठरली आहे. तसे प्रयोगांती स्पष्ट झाले आहे. या वनस्पतीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.

पुरुषांमध्येही वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

Last Updated: Sunday, August 11, 2013, 15:51

ब्रेस्ट कॅन्सर होण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये वाढत असल्याचं एका सर्व्हेक्षणात दिसून आलंय. टेक्सास विद्यापीठातील एम. डी. अँडरसन कॅन्सर सेंटरनं हा सर्व्हे केला. अडीच हजारांहून अधिक केसेस त्यासाठी तपासण्यात आल्या.

रिलायन्सच्या मोबाईल टॉवरमुळे कॅन्सर

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 23:09

मोबाईल टॉवरमुळे होणा-या रेडिएशनमुळे एकाच इमारतीतील चौघांना कॅन्सर झाल्याचा आरोप मुंबईच्या विलेपार्लेमधल्या रहिवाशांनी केलाय...

कॅन्सरवर जालिम कडूनिंब

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 14:30

कडूनिंब विविध आजारावर रामबाण औषध. आता हेच कडूनिंब कॅन्सरवर मात करू शकते हे स्पष्ट झालंय. त्यामुळे लवकरच कॅन्सरवर कडूनिंबाचे औषध उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कॅन्सरला मराठीत कर्करोग असेही म्हणतात.

पेप्सी, कोक देते कॅन्सरला आमंत्रण

Last Updated: Thursday, July 4, 2013, 16:25

आजपासून तुम्ही कोक आणि पेप्सी पिण्यावर लगाम घातला नाहीत तर तुमचे काही खरे नाही. कॉलेज तरूण-तरूणींची पहिली पसंती असते ती, कोल्डड्रींकला. काहीजण कोकला तर काहीजण पेप्सीला प्राधान्य देतात. मात्र, या पेयांमुळे धोका आहे हे कोणी सांगितले नसेल ना! अहो आपले आरोग्य धोक्यात आणण्याचे काम ही शितपेय करीत आहेत. हे अमेरिकेतील एका संशोधनातून पुढे आले आहे.

टॅल्कम पावडरमुळे वाढतो कॅन्सरचा धोका

Last Updated: Thursday, June 20, 2013, 14:49

‘टॅल्कम पावडर’ वापरणाऱ्या स्त्रियांना अंडाशयाचा कॅन्सरचा धोका एक चतुर्थांश वाढतो, असं आता एका नव्या शोधानुसार समोर आलंय.

धुम्रपान कराल तर अविवाहित राहाल!

Last Updated: Saturday, June 1, 2013, 08:20

सिगारेटमुळे तुमचं आयुर्मान कमी होतं. तुम्हाला गंभीर आजार जडण्याची शक्यता वाढते. तसेच सिगारेटमुळे तुम्हाला आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची वेळ येऊ शकते.

कॅन्सर टाळण्यासाठी स्तनांवर शस्त्रक्रिया, अॅन्जेलिनाचं धाडसी पाऊल

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 13:36

अँजेलिना जोली या हॉलिवूडच्या प्रसिद्ध नायिकेनं जगभरातल्या स्त्रियांसमोर एक आदर्श घालून दिलाय. आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका आहे, हे लक्षात आल्यानंतर तिनं आपले दोन्ही स्तन शस्त्रक्रिया करून काढून टाकलेत.

कॅन्सर पेशंट्सना दिलासा

Last Updated: Monday, April 1, 2013, 23:13

कॅन्सर पेशंटसना आता स्वस्त दरात कॅन्सरची औषधं स्वस्त मिळणार आहेत. नोवार्टिस कंपनीनं दाखल केलेली याचिका कोर्टानं फेटाळल्यानं भारतीय पेशंटसना मोठा दिलासा मिळाला.

सचिन तेंडुलकर नव्या अवतारात

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 13:09

हैदराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एका नव्या अवतारात दिसला. मैदानात अनेकदा टीम इंडियाला विजय मिळवून देणारा सचिन तेंडुलकर मिशन कँसरशी जोडला गेला आहे.

व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांची कॅन्सरवर मात

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 07:30

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ कँन्सरचे ऑपरेशन आणि इलाज करून तब्बल दोन महिन्यांनंतर क्युबामध्ये परतलेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी मायदेशी परतल्याची घोषणा केली आहे.

मनीषा कोइरालाची कॅन्सरवर मात

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 17:33

कॅन्सरशी झगडत असणाऱ्या अभिनेत्री मनीषा कोइरालाची न्यू यॉर्कमध्ये यशस्वी सर्जरी झाली असून आता ती कॅन्सरमधून बचावली आहे.

न्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...

Last Updated: Thursday, December 6, 2012, 15:08

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गुरुवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही माहिती मनीषाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.

संजय दत्त `लोका सांगे ब्रह्मज्ञान...`

Last Updated: Friday, November 30, 2012, 16:43

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने नेहमीच आपल्या वागण्यामुळे वाद ओढावून घेतले. यापूर्वी तुरूंगाची हवा खाल्लेल्या संजय दत्तने कालांतराने सिनेक्षेत्रात पुन्हा येऊन आपलं नाव रोशन केलं खरं.. पण पुन्हा एकदा त्याने त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंबाला नाराज केलं.

पान खाल्याने कॅन्सरचा धोका वाढतो

Last Updated: Saturday, October 27, 2012, 18:42

तुम्हाला जर पान खाण्याची सवय असेल तर ती सोडली पाहिजे. पान खाण्यामुळे कॅन्सर होवू शकतो, हे संशोधनानंतर स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जेवण केल्यानंतर पान खायची सवय असेल तर काही अपायकारक गोष्ट ठरून तुमच्या जीवावर बेतू शकते, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

शरद पवारांचा कॅन्सरशी लढा...

Last Updated: Sunday, October 21, 2012, 14:31

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरने सांगितले, साहेब तुमचे सहाच महिने उरले आहेत. काही कागदपत्रे तयार करायची असतील तर करून घ्या, असा सल्ला दिला. मात्र मी खचलो नाही, निकराचा लढा दिला. मेडिकल ट्रीटमेंट यांच्या जोरावर आज मी `कॅन्सर` पासून पूर्णपणे मुक्त झालो आहे, असे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात सांगितले.

स्कीन कॅन्सरवर गुणकारी क्रीम!

Last Updated: Monday, October 8, 2012, 16:54

कर्करोग हा रोग इतका भयानक आहे की त्याचा विचार केला तरी नकोसे वाटते. कारण या रोगापासून सहजा सहजी सुटका होत नाही. रोग्यांना याचा त्रासही सोसावा लागतो. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलाच एक म्हणजे त्वचेचा कर्करोग अर्थात स्कीन कॅन्सर.

दादा-बाबांचा वाद; अधिकारी पडले चाट

Last Updated: Friday, September 21, 2012, 16:07

औरंगाबादच्या कॅन्सर हॉस्पीटलच्या उदघाटनाचा वाद शिगेला पोहचलाय. हॉस्पिटलच्या श्रेयावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू झालाय.

टी-२०च्या आव्हानासाठी युवी सज्ज…

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 17:33

कॅन्सरसारख्या आजारातून सावरून भारतीय क्रिकेटफॅन्सच्या गळ्यातला ताईत बनलेला ‘युवी’चं लवकरच मैदानात आगमन होणार आहे. सप्टेंबर २०१२ मध्ये होणाऱ्या विश्व ट्वेन्टी-२० खेळायची, त्याची स्वत: ची इच्छा आहे. या मॅचसाठी मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार होणं हे एक आव्हान असल्याची त्यालाही जाणीव आहे. पण, त्याबरोबरच या मॅचसाठी आपण नक्कीच मैदानात उतरु, हा विश्वासही त्याच्या मनात आहे.

९ एप्रिल रोजी युवी परतणार मायदेशी

Last Updated: Friday, April 6, 2012, 12:45

युवराजच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. युवराज सिंग ९ एप्रिल रोजी भारतात परतणार आहे. मायदेशी परतल्यावर युवराज ११ एप्रिलला पत्रकार परिषद घेणार आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे युवराज याच्या कँसरवर गेले काही महिने उपचार चालू होते.

गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्तनाचा कॅन्सर

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 10:36

गर्भ निरोधक गोळ्या सेवन केल्या तर स्तनाचा तसेच गर्भाचा कॅन्सर होऊ शकतो. ही शक्यता एका अभ्यासातून पुढे आली आहे. इंजेक्सजनच्यामाध्यातून औषधात घेतल्याने स्तनाचा कॅन्सर १.७ टक्के तर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे १.४ टक्के धोका असतो.

युवराज सिंगचा ट्युमर जवळपास नष्ट

Last Updated: Thursday, February 16, 2012, 13:08

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी एक खूषखबर आहे. तुम्हाला हे ऐकून नक्कीच आनंद होईल की युवराज सिंग याचा ट्युमर आता जवळपास नष्ट झाला आहे. ही माहिती युवीने स्वतः ट्विटरवर दिली आहे. युवराजवर सध्या अमेरिकेतील बोस्टनमध्ये इलाज सुरू आहेत.

शेवटी केस गेले. पण, हिंमतीने जगतोय

Last Updated: Friday, February 10, 2012, 11:31

टीम इंडियाचा ऑल राऊंडर युवराज सिंग याच्यावर सध्या अमेरिकेमध्ये फुप्फुसांच्या कॅन्सरवरील इलाज चालू आहेत. इलाजादरम्यान त्याने आपले नवे फोटो शुक्रवारी ट्विटरवर अपलोड केले आहेत. या फोटोमध्ये युवराजचं डोकं मात्र भादरलेलं आहे.

युवराज करणार मेमध्ये मैदानावर ‘राज’!

Last Updated: Monday, February 6, 2012, 18:24

अमेरिकेत केमोथेरपी घेत असलेला भारतीय स्टार बॅटसमन युवराज सिंग याला फुफुसांचा कॅन्सर नसून त्याच्या फुफुसांमध्ये एक ट्युमर आहे. हा ट्युमर काढणे शक्य आहे. त्यामुळे युवराज सिंग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मैदानात खेळण्यास सज्ज होईल, असा विश्वास युवराजवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे.

कॅज्युल सेक्सने वाढतोय सर्व्हाइकल कॅन्सर!

Last Updated: Monday, November 7, 2011, 15:16

सेक्स प्रति दाखविलेल्या कॅज्युल अप्रोचमुळे ब्रिटनमधील महिलांमध्ये सर्व्हाइकल कॅन्सरचे प्रमाण वाढत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.