‘ओल्या मातीचा गोळा’ सलमान खान , salaman is very much flexible - sohail

`सलमान ओल्या मातीचा गोळा`

`सलमान ओल्या मातीचा गोळा`
www.24taas.com, मुंबई

‘सलमान एक ओल्या मातीचा गोळा आहे, त्याला आपण जसा आकार देऊ तसा तो वागतो’ असं म्हणणं आहे सलमान खानचा छोटा भाऊ आणि निर्माता-अभिनेता सोहेल खानचं...

सलमान खानची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे त्याची बहुमुखी प्रतिभा आणि लवचिकता, असं सोहेलला वाटतंय. सेलिब्रिटी क्रिकेट लीगसाठी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत सोहेल खाननं सलमानबद्दल हे वक्तव्यं केलंय. सोहेल म्हणतो, ‘सलमान ओल्या मातीप्रमाणे आहे, त्याला तुम्ही कोणत्याही साच्यात घडवू शकता. प्रेक्षकांना सलमानचा कंटाळा येत नाही त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तो सिनेमात रोमान्स, अॅक्शन, भावनात्मक आणि इतर कोणत्याही प्रकारच्या भूमिका सहजपणे निभावतो’.

‘तो एकमेव अभिनेता आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विशिष्ट गोष्ट मिळेल. तो तुम्हाला कोणत्याही एका शैली किंवा अभिनयाच्या बंधनात अडकवून ठेवत नाही’.
सलमान खानची ‘दबंग २’ शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. अरबाज खान दिग्दर्शित या सिनेमात सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खानची पुन्हा एकदा दबंगगिरी प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळेल.

First Published: Thursday, December 20, 2012, 17:41


comments powered by Disqus