Last Updated: Thursday, March 20, 2014, 21:16
www.24taas.com,झी मीडिया, मुंबईसलमान खान आणि सोनम कपूर यांचा सिनेमा बडे भैय्या या नावाने येणार होता. पण चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या राजश्री बॅनरचे सुरज बडजात्या यांनी या चित्रपटाचं नाव आता वेगळंच असल्याचं सांगितलं आहे.
या चित्रपटाचं नाव `प्रेम रतन धन पायो` असं असणार आहे. तसेच सलमान खानचं नाव पुन्हा एकदा या चित्रपटात प्रेम असणार आहे. यापूर्वी बडजात्या यांच्याच मैने प्यार किया मध्ये सलमाने प्रेम नावाने भूमिका साकारली होती.
प्रेम रतन धन पायोची शुटिंग मे महिन्यात कर्जतजवळ पार पडणार आहे. नितिन चंद्रकात देसाई यांच्या स्टुडिओत हे शुटिंग होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या स्टुडिओत जोधा अकबर या चित्रपटाचंही शुटिंग झालं होतं.
प्रेम रतन धन पायो चित्रपटात अनुपम खेर, स्वरा भास्कर, नितिन मुकेश, आणि दीपक डोबरियाल यांची मुख्य भूमिका असेल. पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत हा सिनेमा रिलीज करण्याचा प्रयत्न असणार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 20, 2014, 21:16