सलमान माझ्यापासून केवळ एक मॅसेज दूर : कतरिना, salman is just a message away - katrina kaif

सलमान माझ्यापासून केवळ एक मॅसेज दूर : कतरिना

सलमान माझ्यापासून केवळ एक मॅसेज दूर : कतरिना

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ हिनं पुन्हा आपल्या आणि सलमान खान यांच्या नात्यातला गोडव्याची मीडियासमोर उघड उघड चर्चा केलीय. त्यामुळे, पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया या दोघांच्या नात्याकडे उंचावल्यात.

एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान कतरीनानं सलमान खान आपल्यापासून केवळ एक मॅसेज दूर असल्याचं म्हटलंय. सलमानसोबत आपले संबंध अजूनही मधून आहेत आणि सलमान माझ्यापासून दूर नाही तर माझ्या अगदी जवळ आहे, असं कतरिनानं म्हटलंय.

मीडियात, कतरिना आणि सलमानच्या अफेअर आणि ब्रेक-अपच्या अनेक चर्चा दिसून आल्या होत्या. सलमान आणि कतरिना `टायगर` या सिनेमात एकत्र दिसले होते. पण, या चर्चांना थोडी विश्रांती तेव्हा मिळाली जेव्हा या पिक्चरमध्ये रणबीर कपूरनं एन्ट्री मारली. रणबीर आणि कतरिनामधल्या लव्ह अफेअर प्रकरणानंतर सलमाननं कतरिनापासून लांब राहणंच पसंत केल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, कतरिनानं आपले सलमानसोबतचे संबंध कधीच संपुष्टात आले नसल्याचं मान्य केलं नाही. किंबहुना जवळच्या नात्यावरही कधी तिनं शिक्कामोर्तब केलं नाही.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे संबंध संपुष्टात आल्यानंतर सलमानच्या आयुष्यात कतरिना कैफचा प्रवेश झाला होता. दोघांची मैत्री झाली आणि कतरिनाचं बॉलिवूड करिअर फळफळलं. त्यानंतर कतरिनाला सलमानच्या गर्लफ्रेंडच्या रुपातच प्रेक्षक पाहू लागले होते. परंतु, त्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चाही तेवढ्याच रंगल्या.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 20, 2014, 17:25


comments powered by Disqus